www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्रातल्या उमेदवार जाहीर न झालेल्या जागांचा समावेश असण्याची चिन्ह आहेत.
नांदेड आणि पुण्याच्या उमेदवारांची नावे अजून जाहीर झालेली नाहीत. त्यामुळं आजच्या यादीत सर्वांचं लक्ष लागलेल्या पुणे आणि नांदेडची सोडत निघण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी यांच्यावर घोटाळ्यांप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यामुळं त्यांना उमेदवारी देण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळं काँग्रेस त्यांच्या नातेवाईकांना किंवा निकटवर्तीयांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
नांदेडमध्ये विद्यमान खासदार भास्करराव खतगावकर यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं अशोक चव्हाण आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तर पक्षात मंत्री डी.पी. सावंत यांचा नावावर चर्चा सुरू असल्याचं समजतंय.
औरंगाबादच्याही उमेदवारीचा तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या नावाची चर्चा रंगतेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.