राष्ट्रवादी

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल

सोलापूरच्या बार्शी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत अपहार आणि गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Jun 14, 2017, 09:04 AM IST

नाशिक जिल्ह्यात संप सुरुच राहणार, सर्वच राजकीय पक्ष मैदानात

जिल्ह्यातील किसान क्रांती आंदोलनाच्या बैठकीत आता सर्वच राजकीय पक्ष मैदानात आले आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, राष्ट्रवादीच्या अमृता पवार आणि मकपाचे आमदार ही यात सक्रियपणे नेतृत्व करू लागले आहेत. आंदोलन अधिक बळकट करण्यासाठी उद्या शेतकऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे.

Jun 3, 2017, 02:40 PM IST

संपामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान, हिंसा घडविण्यात दोन्ही काँग्रेसचा डाव : मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या संपाच्या मुद्यावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले आहे. संपाच्या आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव असल्याचा सणसणीत आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय. 

Jun 1, 2017, 05:49 PM IST

तटकरे कुटुंबातील संघर्ष अजूनही कायम

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे पुतणे आमदार अवधूत तटकरे यांच्यातील संघर्ष अद्याप संपलेला दिसत नाही. 

May 31, 2017, 11:29 PM IST

मेळाव्यासाठी लोकांना पैसे वाटप केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्रात आपली पकड मजूबत करण्याची एकही संधी भाजप दवडू इच्छीत नाही. त्याचाच परिपाक काल इस्लामपूरच्या मेळाव्यात झाला. पण या मेळाव्यातली गर्दी विकतची असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. सांगली आणि परिसरात त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. भाजपनं सगळे आरोप फेटाळलेत...एवढचं नाही, फासे राष्ट्रवादीवरच उलटवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

May 30, 2017, 05:18 PM IST

मालेगाव पालिकेत दोन्ही काँग्रेसची आघाडी, चर्चेचे गुऱ्हाळ

महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होऊ शकलेली नाही. त्यामुळे एकमेकांविरोध दोन्ही पक्ष लढले. आता राज्यात चित्र वेगळे दिसण्याचे संकेत मिळत आहेत. मालेगाव पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीची चाचपणी सुरु झालेय.

May 27, 2017, 10:57 PM IST

राष्ट्रवादीने दिले आव्हान, ईव्हीएम मशिन करणार हॅक!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मतदान मशिनवर ठपका ठेवला. ईव्हीएम मशिनचा भाजपच्या विजयात मोठा वाटा असल्याचा आरोप केला. यात आम आदमी, बसपा, समाजवादी पार्टीतील नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन हॅक करण्याचे आव्हान दिले. हे आव्हान राष्ट्रवादीने स्विकारले आहे.

May 26, 2017, 09:46 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा भाजप-राष्ट्रवादीची रस्सीखेच

पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सध्या विकासकामं, आगामी प्रकल्प यापेक्षा कोणता मुद्दा चर्चेत असेल तर तो विरोधी पक्षासाठी दिल्या जाणाऱ्या कक्षाचा.

May 22, 2017, 09:05 PM IST