मुंबई : महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होऊ शकलेली नाही. त्यामुळे एकमेकांविरोध दोन्ही पक्ष लढले. आता राज्यात चित्र वेगळे दिसण्याचे संकेत मिळत आहेत. मालेगाव पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीची चाचपणी सुरु झालेय.
मालेगाव महापालिकेत काँग्रेसने आघाडीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्क सुरू केलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी फोनवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्क साधला, अशी माहिती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलीय.
तसेच मालेगाव महापालिकाबाबत स्थानिक नेत्यांशी चर्चा करून आघाडीबाबत अंतिम निर्णय घेऊ असे तटकरे यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय होईल, असे संकेत त्यांनी दिलेत.