चाहत्यांना चेटकीण बनून घाबरवणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण, तुम्ही ओळखलं का?

'या' अभिनेत्रीचा नुकताच व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांनी आश्चर्याचा धक्का घेतला आहे. नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असलेली ही अभिनेत्री तिच्या नव्या लूकने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. चला पाहूया, कोण आहे ही अभिनेत्री?    

Intern | Updated: Dec 2, 2024, 02:42 PM IST
चाहत्यांना चेटकीण बनून घाबरवणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण, तुम्ही ओळखलं का? title=

नॅशनल अवॉर्ड विजेती अभिनेत्री नीना गुप्ता 
नीना गुप्ता यांचं नाव आपल्या परिचयाचं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच मनात त्यांनी विशेष स्थान मिळवलं आहे. वयाच्या 65व्या वर्षीही त्या Gen-Z लूकसाठी चर्चेत असतात. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच त्यांचा फॅशन सेन्सही अनेकांना प्रेरणा देतो.  नीना गुप्ता यांचा नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी एका चेटकीणीचा लूक साकारला आहे, जो खूप वेगळा आणि अनोखा आहे.  

व्हिडीओची कथा आणि नीना गुप्ता यांचा लूक 
व्हिडीओच्या सुरुवातीला तीन युट्यूबर्सचे अपहरण झाल्याचं दाखवलं जातं आणि त्यानंतर नीना गुप्ता 'गंजी चुडेल' या गेटअपमध्ये समोर योतात. या लूकमध्ये त्यांना ओळखणं देखील खूप कठीण जात आहे. या व्हिडीओ मध्ये नीना गुप्ता युट्यूबर्सना म्हणतात, 'थकली मी मीम बनून, आता तुम्हाला मला बेब बनवायचं आहे!' त्यांच्या हा संवाद ऐकून प्रेक्षकांना हसू अनावर झाले. 

सोशल मीडियावर चर्चा आणि प्रतिक्रिया
हा व्हिडीओ 'यूट्यूब इंडिया'ने शेअर करत लिहिलं आहे, 'भूत आयकॉनिकपासून यूथ आयकॉनिकपर्यंतचा प्रवास - Gen-z चेटकीण!'  बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. नीना गुप्ता यांचा हा लूक पाहून सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का बसला आहे.  तुम्ही हा व्हिडीओ पाहिला का? जर नाही, तर एकदा नक्कीचं पाहा...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

करिअरबद्दल बोलायचं झालं तर नीना गुप्ता यांनी आपल्या करिअरमध्ये 3 नॅशनल अवॉर्ड्स,1 फिल्मफेअर आणि 2 फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स जिंकले आहेत. बॉलिवूडमध्ये त्यांना अनेक वर्षे झाली असून, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या भूमिकांद्वारे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अलीकडेच त्या '1000 बेबीज' या दाक्षिणात्य वेब सीरिजमध्ये दिसल्या होत्या. त्याआधी, 'ऊंचाई,' 'वध,' आणि 'पंचायत' यांसारख्या चित्रपट आणि वेब सीरीजमधून त्यांनी चाहत्यांवर प्रभाव टाकला होता.  नीना गुप्ता यांच्या प्रत्येक भूमिकांमधून त्यांची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला  मिळते.