राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल

सोलापूरच्या बार्शी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत अपहार आणि गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Updated: Jun 14, 2017, 09:04 AM IST
राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल title=

सोलापूर : सोलापूरच्या बार्शी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत अपहार आणि गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सोपल यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळातील अठरा संचालक आणि १०१ कर्मचाऱ्यांविरोधात अपहार तसंच फसवणुकीचा गुन्हा बार्शी पोलिसांनी दाखल केलाय. जिल्हा विशेष लेखा परिक्षण अधिकारी व्ही.बी.डोके यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. 

या तक्रारीत बाजार समितीच्या निधीत अपहार, जमिनीत मिळणाऱ्या भाड्यामध्ये अपहार, नियमबाह्य कर्मचारी भरती तसंच सुट्टीच्या दिवशी आणि गैरहजर कालावधीत कर्मचाऱ्यांचे वेतन देऊन अपहार करण्यात आल्याचे आरोप लेखा परीक्षण अधिकाऱ्यांनी केलेत. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

आमदार सोपल यांच्यावर गुन्हा दाखल होताच बार्शी शहरासह तालुक्यात तणावाचे वातावरण आहे.