देशात मोदींची लाट कायम, दोन्ही राज्यात मुख्यमंत्री भाजपचाच - शाह

दोन्ही राज्यात भाजपाला मिळालेलं यश हे भाजपा कार्यकर्त्यांचा विजय आहे. देशातील जनता मोदी यांच्या पाठिशी उभी राहिली असून पाठिंब्याबद्दल जनतेचे विशेष आभार मानत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देशात नरेंद्र मोदींची लाट कायम असल्याचं म्हटलंय. 

Updated: Oct 19, 2014, 05:40 PM IST
देशात मोदींची लाट कायम, दोन्ही राज्यात मुख्यमंत्री भाजपचाच - शाह title=

नवी दिल्ली: दोन्ही राज्यात भाजपाला मिळालेलं यश हे भाजपा कार्यकर्त्यांचा विजय आहे. देशातील जनता मोदी यांच्या पाठिशी उभी राहिली असून पाठिंब्याबद्दल जनतेचे विशेष आभार मानत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देशात नरेंद्र मोदींची लाट कायम असल्याचं म्हटलंय. 

महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यात काँग्रेसला विरोधीपक्षनेतेपद सुद्धा मिळणार नाही, काँग्रेसमुक्त भारत मोहीमेस आम्हाला यश मिळालं, असं म्हणत देशात असलेली मोदी यांची लाट संपलेली नाही, केंद्रावर लोकांचा विश्वास सिध्द झाला, महाराष्ट्र-हरयाणा राज्यात चांगलं सरकार देवू असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केलाय. 

शिवसेनेबाबत बोलतांना अमित शहा म्हणाले, शिवसेनेशी आम्ही कधीही नातं तोडण्याचा प्रयत्न केला नाही, महाराष्ट्राबाबत आम्ही जे म्हटलं ते अखेर खरं ठरलं. शिवसेना देत असलेल्या ११९ जागा आम्ही जिंकलो आहोत, असंही ते म्हणाले. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवलाय. याबाबत संकेत देत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत करणार असल्याचं अमित शहा म्हणाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.