दादांचं राजकारण त्यांच्यावरच उलटलं!

दोन स्थानिक तुल्यबळ नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण करायचा, दोघांना गोंजारायचं आणि गरज पडेल तेव्हा एकाला दूर सारायचं हे अजित पवारांच्या राजकारणाचं सूत्र… पण त्यांचं हेच सूत्र त्यांच्यावर उलटलं आणि विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. त्यामुळं आता राष्ट्रवादीला पर्यायानं दादांना शहरातलं त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडावं लागतंय.

Updated: Oct 27, 2014, 09:13 PM IST
दादांचं राजकारण त्यांच्यावरच उलटलं! title=

पुणे: दोन स्थानिक तुल्यबळ नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण करायचा, दोघांना गोंजारायचं आणि गरज पडेल तेव्हा एकाला दूर सारायचं हे अजित पवारांच्या राजकारणाचं सूत्र… पण त्यांचं हेच सूत्र त्यांच्यावर उलटलं आणि विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. त्यामुळं आता राष्ट्रवादीला पर्यायानं दादांना शहरातलं त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडावं लागतंय.

पिंपरी चिंचवड आणि अजित पवार हे समिकरण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पुरत धुळीस मिळालंय. इथं पिंपरी चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांना दारुण पराभवाला सामोर जावं लागलं. विशेष म्हणजे दोन मतदार संघात तर त्यांना त्यांच्याच बंडखोरांनी पाणी पाजलं. पण भूतकाळ पहिला तर दादांची राजकारण करण्याची पद्धत त्यांच्यावर उलटल्याचं स्पष्ट होतंय. 

२००९ निवडणुकीत दादांनी भोसरीमध्ये त्यांच्याच पक्षाच्या उमेदवार मंगला कदम यांच्या विरोधात उभ्या असलेल्या विलास लांडे यांना ताकत पुरवली आणि विजयी झाल्यावर त्यांना पक्षात घेतलंच नाही तर त्यांच्या पत्नीला महापौर ही केलं. दूसरीकडे चिंचवडमध्ये ही लक्ष्मण जगताप यांनाही काँग्रेसच्या विरोधात अपक्ष उतरवत त्यांना विजयी केलं. पवारांची ही खेळी त्यांनाच अंगलट आली. लक्ष्मण जगतापांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आणि विजय मिळवला. भोसरीमध्ये ही स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे यांनी बंडखोरी करत विलास लांडे यांना पराभूत केलं. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी दादांनी लढाई प्रतिष्ठेची केली होती. त्यांच्या भाषणातून जाणवत होतं. 

कधी काळी दादांनी ज्या खेळी करून विजय मिळवला त्याच खेळी करून त्यांच्याच चेल्यांनी त्यांना बालेकिल्यात पराभूत केलं. आता त्याचे महापालिकेतही परिणाम होण्याची शक्यता आहे. एकूण काय तर ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ शहरात झाली, ही दादांसाठी शिकवण देणारी ठरलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.