मनसेचा नाशिक, औरंगाबादमध्ये जल्लोष
नाशिकमध्ये महापौरपदी मनसेचा उमेदवार बसणार हे पक्कं झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा केला. वाद्यांच्या तालावर नाचणारे कार्यकर्ते, त्यांच्या हातात फडकणारे मनसेचे झेंडे आणि जयजयकाराच्या घोषणा यांनी नाशिकमधलं वातावरण दुमदुमून गेल होते.
Mar 15, 2012, 05:01 PM ISTविश्वासाला तडा जाऊ देणार नाही- राज
नाशिक महापालिकेच्या सत्तासंपादनानंतर राज ठाकरेंनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतलीय. नाशिकचा विकास करुन दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
Mar 15, 2012, 03:10 PM ISTराज-मुनगंटीवार भेटीने नाशिकचा गुंता सुटणार?
नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला महापौर होण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 13, 2012, 06:58 PM ISTनाशिकमध्ये माझाच महापौर - राज ठाकरे
नाशिकमध्ये मनसेचाच महापौर असेल, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत केला. ते मनसेच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजीत मेळाव्यात मनसैनिकांना मार्गदर्शन करत होते.
Mar 9, 2012, 10:04 PM ISTकाय बोलणार राज? याकडे लक्ष...
मनसेचा आज सहावा वर्धापनदिन आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत षण्मुखानंद सभागृहात सभा घेणार आहेत. महापालिकांच्या सत्तासमिकरणाबाबत राज ठाकरे काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
Mar 9, 2012, 04:49 PM ISTमनसेचा ६ वा वर्धापनदिन, आज ‘राज’गर्जना!
मनसेचा आज सहावा वर्धापनदिन आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत षण्मुखानंद सभागृहात सभा घेणार आहेत. महापालिकांच्या सत्ता समीकरणाबाबत राज ठाकरे काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
Mar 9, 2012, 04:27 PM ISTठाणे झेडपीतही राज यांचा सेनेला पाठिंबा!
ठाणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सेनेला साथ दिल्यानंतर आता ठाणे जिल्हा परिषदेतही हा ठाकरे पॅटर्न दिसणार आहे. या संदर्भातील माहिती मनसेचे आमदार रमेश पाटील यांनी दिली.
Mar 7, 2012, 07:52 PM ISTसुवर्ण कन्यांना बाळासाहेबांचा आशीर्वाद
भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावणा-या सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे या दोन महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
Mar 7, 2012, 06:22 PM ISTठाकरे बंधू एकत्र आहेत- पिचड
ठाण्याच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून परत एकदा स्पष्टपणे हे दिसून आलं आहे की दोन्ही ठाकरे बंधु एक आहेत. ठाकरे बंधु लोकांची दिशाभूल करत आहेत आणि हे परत एकदा सिद्ध झालं आहे.
Mar 7, 2012, 08:26 AM ISTबाळासाहेबांसाठी ठाण्यात राजचे ‘एक पाऊल पुढे’
ठाण्याच्या जनतेने शिवसेना-भाजप युतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे ठाण्यात विकासाच्या मुद्द्यावर मी शिवसेना भाजप युतीला पाठिंबा देत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट करून एका वेगळ्या समीकरणाची सुरूवात केली आहे. तसेच बाळासाहेबांच्या इच्छेमुळेही मी युतीला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Mar 6, 2012, 05:25 PM ISTठाण्यात ‘राज’ की बात, सेनेचा महापौर?
ठाणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तटस्थ राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संदर्भात चर्चेच्या फेऱ्या काल रात्रीपासून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Mar 6, 2012, 01:13 PM ISTराज ठाकरे करणार उद्या पत्ते खुले!
ठाणे महापालिकेच्या महापौरपदासाठी जोरदार चुरस असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्या आपले पत्ते ओपन करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्य दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणूकीत मनसे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Mar 6, 2012, 01:11 PM ISTकृपाशंकर सिंह सर्वात मोठे दलाल- राज ठाकरे
सोनिया गांधी आणि अहमद यांच्यापर्यंत अनेकांना पोहचविणारे कृपाशंकर सिंह हे मोठे दलाल असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. कृपाशंकर सिंह यांचा समोर आलेला घोटाळा म्हणजे हिमनगाचे एक टोक असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
Mar 2, 2012, 05:07 PM ISTराज'मार्ग' अवघडच....
मुंबई महापालिका निवडणूकीत किंग बनण्याचं स्वप्न मनी बाळगेल्या राज ठाकरेंची निकालानंतर निराशाच झाली. मुंबईतल्या असमाधानकारक कामगिरीसाठी काही प्रमाणात स्वतः राज ठाकरे यांना तर ब-याच प्रमाणात पक्षसंघटनेला जबाबदार मानलं जातंय. मुंबई महापालिका निवडणूकीचे निकाल पाहाता 2014 साली होणा-या विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीनं मनसेला कामगिरी सुधारण्यासाठी बराच वेळ हाती आहे.
Feb 29, 2012, 04:31 PM ISTमुख्यमंत्र्यांचा मनसे, सेनेला टोला
केवळ दुकानांवरील मराठी पाट्या मराठीत लिहून भाषा टिकवता येत नाही, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज शिवसेना आणि मनसेला लगावला.
Feb 27, 2012, 10:36 PM IST