‘बंधुत्व’ आणि ‘मित्रत्व’
प्रसाद घाणेकर
ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं तमाम मराठी मनांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरेंच्या एका हृदयाने ते काही काळासाठी का होईना पण केलं. मीडियावाल्यांनी अनेक शक्यतांच्या फटाक्यांची आतषबाजी करत चर्चेला तोंड फोडलं. मग पिंपळपारावरील बैठक तरी कशी मागे राहील. पिंपळपारावरच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटू लागले. आणि त्यांनी विषय निवडला ‘हे मित्रत्व आणि हे बंधुत्व’.
राज की बात !
ऋषी देसाई
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हृद्यावरील ऑपरेशनसाठी केवळ दोन मतप्रवाहच नाही तर सारेच राजकारणीही एक झाले होते.. सा-यांच लक्ष लीलावतीमधून शस्त्रक्रिया यशस्वी होते ही बातमी कधी येते याकडे लक्ष लागलं होत..
राज ठाकरेंच्या घरून उद्धवना जेवणाचा डबा
डॉक्टरांनी काही पथ्थ पाळायला सांगितली आहेत. डॉक्टरांनी सूचविलेल्या पथ्यानुसार तयार केलेल्या जेवणाचा डबा राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला आणि राज यांची आई कुंदा ठाकरे या उद्धव यांच्यासाठी देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Jul 20, 2012, 11:35 AM ISTराजची उद्धववर माया किती, पोहचले पुन्हा लीलावती
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे थोड्याच वेळापूर्वी लीलावती हॉस्पिचलमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्यावर आज अँजिओप्लास्टी होणार आहे. अँजिओप्लास्टीवेळी त्यांचे बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहणार आहेत.
Jul 20, 2012, 10:49 AM ISTराज ठाकरे पुन्हा ‘मातोश्री’वर
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या अँन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांचे बंधू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली.
Jul 19, 2012, 10:44 PM ISTराजना दिल्लीतून फोन आला असता तर...
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तटस्थ राहणार असल्याची भूमिका मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलीय. दिल्लीतून कोणत्याही ज्येष्ट नेत्यानं संपर्क न साधल्यानं मनसेनं हा निर्णय घेतलाय.
Jul 19, 2012, 12:17 PM ISTराज ठाकरे राहणार उद्धव ठाकरेंसोबत!
तब्येत सुधारेपर्यंत उद्धव सोबतच राहणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच शुक्रवारी होणाऱ्या अँजिओप्लास्टीच्या वेळी उद्धवसोबत राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
Jul 18, 2012, 09:40 PM ISTउद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी?
शिवसेना कार्याध्य़क्ष उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी अँजिओप्लास्टी होण्याची शक्यता आहे. बायपास न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अँजिओप्लास्टीवेळी सर्व ठाकरे कुटुंबीयांनी उपस्थित रहावे, अशी शिवसेनाप्रमुखांची इच्छा आहे.
Jul 18, 2012, 09:12 PM ISTराज ठाकरे देणार का काँग्रेसला पाठिंबा?
राष्ट्रपतीपदाची निवडणूक उद्या होतेय आणि या निवडणुकीत काँग्रेसनं मनसेकडेही पाठिंबा मागितला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि काँग्रेसला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय.
Jul 18, 2012, 05:40 PM ISTकाय बोलले राज मातोश्रीतून बाहेर पडताना
काही लागलं तर फोन करा... सांभाळून राहा, असे राज ठाकरेंनी मातोश्रीहून बाहेर पडताना आपला मोठा भाऊ आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Jul 16, 2012, 09:01 PM ISTराज-उद्धव यांची शेवटची भेट २००८ साली
आज राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंची भेट तब्बल साडेतीन वर्षांनी झाली. यापूर्वी २००८ साली राज यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.
Jul 16, 2012, 06:42 PM ISTराज बनले 'सारथी' उद्धवांना सोडले 'मातोश्री'वरती
गेल्या काही वर्षांपासून राजकीय बंधनांमध्ये अडकलेल्या ठाकरे बंधूंनी सर्व बंधने झुगारून रक्ताच्या नात्यांना जवळ करत एकाच दिवशी एक नाही दोन वेळा भेट घेतली. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या गाडीतून मातोश्रीवर सोडले.
Jul 16, 2012, 06:27 PM ISTराज ठाकरे बाळासाहेबांना भेटायला 'मातोश्री'वर
आजाराच्या निमित्ताने का होईना, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आले. तब्बल साडेतीन वर्षानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता राज ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे.
Jul 16, 2012, 06:13 PM ISTमनसे उमेदवारांना चिंता, मराठी मतदारांची वानवा
मीरा भाईंदर महापालिकेत सर्वच पक्षांमध्ये तिकिट वाटपावरून रणसंग्राम सुरू असतानाच मनसेनं इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. 95 जागांसाठी 140 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.
Jul 15, 2012, 05:48 PM IST'राज ठाकरेंनी केला न्यायालयाचा अवमान'
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरुद्ध उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आलीय. मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं जाहीर सभेस नकार देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल ही अवमान याचिका आहे.
Jul 14, 2012, 12:34 PM IST