राज ठाकरेंचा नाशिकमध्ये 'रोड शो'
पुण्यापाठोपाठ राज ठाकरेंचा आज नाशिकमध्ये रोड शो होतोय. नाशिकमध्ये १२२ जागांवर या पक्षाचे उमेदवार आहेत. चांडक सर्कलपासून या रोड शोला सुरुवात झाली आहे. दोन सत्रांमध्ये या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे.
Feb 9, 2012, 04:26 PM ISTमराठी टक्का कमी करण्याचे षडयंत्र- राज ठाकरे
उत्तर भारतीय मुंबईत किंवा पुण्यात मतदान करतात आणि उत्तर प्रदेशात जाऊनही मतदान करतात. एकच व्यक्ती दोनदोनदा मतदान करतो असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील शहरे वेडीवाकडी वाढताहेत आणि मराठी टक्का कमी करण्याचा षडयंत्र राजरोसपणे रचलं जात आहे असा सावधनतेचा इशारा राज ठाकरेंनी दिला.
Feb 8, 2012, 06:40 PM ISTसेना भवनाचा आधार घेणं हा दुबळेपणा- उद्धव
"कुणी कुठे सभा घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकवेळी सेना भवनाचा आधार घेणं हे दुबळेपणाचं लक्षण आहे." असा राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला.
Feb 8, 2012, 04:12 PM ISTपुण्यात राज ठाकरे, अजित पवार यांचा 'रोड शो'
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामध्ये रोड शो करणार असल्यामध्ये पुण्यातल्या रस्त्यांवर आज रोड शोंचा धमाका आहे.
Feb 8, 2012, 12:12 PM ISTराज ठाकरेंची सभा जांबोरी मैदानात ?
कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील सभेचा आग्रह सोडल्याचं बोललं जात आहे. राज ठाकरेंचा महापालिका प्रचारासाठी होणारी सभा आता वरळीच्या जांबोरी मैदानात होण्याची शक्यता आहे.
Feb 7, 2012, 04:29 PM ISTमनसेची जंग, सेना-राष्ट्रवादी करते बेरंग
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. मनसेला मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदान मिळू नये म्हणून दोन्ही पक्ष एकत्र असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलं आहे. बोरिवलीत रोड शोच्या दरम्यान त्यांनी ही टीका केली.
Feb 5, 2012, 06:09 PM IST'मनसे'तील बंड, अखेर झाले थंड
दादरच्या बालेकिल्ल्यात मनसे आपली बंडाळी थोपविण्यात यश आलं आहे. बहुतांश बंडोखांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे, तर उमेदवारीपासून डावलण्यात आलेले नाराज आता राजीखूशी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचाराला लागले आहेत.
Feb 4, 2012, 10:26 PM ISTसंजय राऊत यांचा राज, राष्ट्रवादीला टोला
राज ठाकरेंनी स्वत:ची तुलना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबरोबर करू नये असा टोला, पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावलाय. तसंच शिवाजी पार्कच्या सायलेन्स झोनला शिवसेनेनेही विरोध केल्याची बाबही राऊत यांनी निदर्शनास आणून दिली.
Feb 4, 2012, 10:10 AM ISTराज यांना शिवाजी पार्क सभेची परवानगी नाही
शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला परवानगी नाकारण्यात आली आहे. पण कुठल्याही परिस्थितीत शिवाजी पार्कवरच्या रस्त्यावर सभा घेणारच, असं आव्हान राज यांनी दिले आहे.
Feb 3, 2012, 08:43 PM ISTमग झक मारायला निवडणुका घेतात – राज
निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांना शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी एका दिवसाची परवानगी देणार नसतील तर काय झक मारायला घ्यायच्या निवडणुका. बंद करून टाका या निवडणुका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केली. शिवाजी पार्कवर सभा घेण्याची मनसेला परवानगी नाकारल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
Feb 3, 2012, 07:00 PM ISTरितेशच्या विवाहाला शाहरुख,अभिषेक आणि राज ठाकरे
आज रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांचा विवाह झाला. बॉलिवूडमधला एक शानदार विवाह सोहळा ‘ग्रँड हयात’ येथे मोठ्या थाटात पार पडला. या लग्नाला बॉलिवूडच्या स्टार्ससह राजकारणातल्या हस्तीही उपस्थित होत्या.
Feb 3, 2012, 06:05 PM ISTराज ठरणार का 'किंगमेकर' ?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्वांच्या चर्चेचा विषय आहे तो राज ठाकरेंच्या मनसेचा. उमेदवारीसाठी परीक्षा, त्यानंतर मुलाखती आणि सर्वात आधी उमेदवारी यादी जाहीर करून राज यांनी बाजी मारली, पण नाराजांनी दोन दिवस केलेल्या उद्रेकानं मनसेसाठीही आव्हान सोपं नसल्याचं समोर आलं.
Feb 3, 2012, 09:03 AM ISTराज यांचे 'ना-राज' बंडखोर
राज ठाकरेंच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही उमेदवारी न मिळाल्यामुळे काही मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी 'कृष्णकुंज'वर धाव घेतली होती. खरं तर जेव्हा जेव्हा मनसैनिक कृष्णकुंजवर येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो. मात्र य़ावेळी चित्र काही वेगळं होतं.
Feb 1, 2012, 10:17 PM ISTप्रचाराआधी राज यांचं देवदर्शन!
महापालिकेचा रणसंग्रामात होण्याआधी राज ठाकरेंनी मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेऊन श्रीगणेशा केला. त्यानंतर त्यांनी जेजुरी गडावर खंडोबाचं दर्शन घेत भंडाराही उधळला.
Feb 1, 2012, 08:43 PM ISTमनसेच्या नाराजांच्या हातात बंडाचा झेंडा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून इतरांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत ठाण्यामध्ये मनसेच्या नाराज कार्यकर्त्यांनी उद्रेक केला. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यासह राज्यातील इतर महापालिकांसाठी मनसेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.
Jan 29, 2012, 09:53 PM IST