नाशिकमध्ये माझाच महापौर - राज ठाकरे

नाशिकमध्ये मनसेचाच महापौर असेल, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत केला. ते मनसेच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजीत मेळाव्यात मनसैनिकांना मार्गदर्शन करत होते.

Updated: Mar 9, 2012, 10:04 PM IST

www.24taas.com,  मुंबई

 

नाशिकमध्ये मनसेचाच महापौर असेल, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत केला. ते  मनसेच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त  आयोजीत मेळाव्यात मनसैनिकांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी हा दावा केला. दरम्यान,  निवडणुकीच्या वेळी झालेली कोणत्याही प्रकारची गद्दारी मी सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.

 

सुरूवातीलाच स्पष्ट करतांना सांगितले की,  पत्रकारांना अपेक्षीत असलेला खाऊ मिळणार नाही. यावरून मेळाव्यात हशा फिकला. त्यानंतर संवाद साधत, ते म्हणाले  सहा वर्षात कसा फरक पडत गेला हे आठवतोय. सहा वर्षात झालेली प्रगती पाहता सहा वर्षांनंतर अनेकांची  झोपमोड झाली आहे.  आता  मला शक्य होईल, तसं तसं सगळं काबीज करीत जाणार आहे, असा आत्मविश्वासही राज ठाकरे यांनी यावेळी दाखवला.

 

मुंबईत जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढविली तेव्हा ७ नगरसेवक निवडून आले होते. आता पाच वर्षांनी २८ नगरसेवक आहेत.   ७ वर्षाचा मुलगा ५ वर्षात २८ वर्षांचा झाला, ही अजबच गोष्ट आहे, असे म्हणून राज ठाकरे यांनी उपस्थितांची दाद मिळविली.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संपूर्ण महाराष्ट्रात आपली छाप सोडली आहे.  खेड, वणी नगरपालिका आपल्या ताब्यात, राज्यात  सुमारे १०० वर नगरसेवक  मनसेचे निवडून आले आहेत.  अशी परिस्थिती राहिली तर २०१४ मध्ये आपण चमत्कार करून दाखवू असा  दावाही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

राज यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

- नाशिकमध्ये मनसेचाच महापौर

- पत्रकारांना अपेक्षीत असलेला खाऊ मिळणार नाही – राज

- सहा वर्षात कसा फरक पडत गेला हे आठवतोय – राज

- सहा वर्षांनंतर झोपमोड त्यांची झाली- राज ठाकरे

- मला शक्य होईल, तसं तसं सगळं काबीज करीत जाणार – राज

- मुंबईत मनसेचा सात वर्षाचा मुलगा गेल्या पाच वर्षात मुलगा २८ वर्षांचा झाला- राज

- खेड, वणी नगरपालिका आपल्या ताब्यात, राज्यात १०० वर नगरसेवक झालेत – राज

- मुंबई, ठाण्यातील आढावा घेणं सुरू आहे- राज

- एप्रिल महिन्यात पक्षात साफसफाई करणार – राज

- निवडणुकीच्या वेळी झालेली कोणत्याही प्रकारची गद्दारी मी सहन करणार नाही- राज

- नाशिकमध्ये मनसेचाच महापौर- राज

- पत्रकारांना अपेक्षीत असलेला खाऊ मिळणार नाही – राज

- सहा वर्षात कसा फरक पडत गेला हे आठवतोय – राज

- सहा वर्षांनंतर झोपमोड त्यांची झाली- राज ठाकरे

- मला शक्य होईल, तसं तसं सगळं काबीज करीत जाणार – राज

- मुंबईत मनसेचा सात वर्षाचा मुलगा गेल्या पाच वर्षात मुलगा २८ वर्षांचा झाला- राज

- खेड, वणी नगरपालिका आपल्या ताब्यात, राज्यात १०० वर नगरसेवक झालेत – राज

- मुंबई, ठाण्यातील आढावा घेणं सुरू आहे- राज

- एप्रिल महिन्यात पक्षात साफसफाई करणार

- निवडणुकीच्या वेळी झालेली कोणत्याही प्रकारची गद्दारी मी सहन करणार नाही

- सर्व काबीज करण्याची इच्छा मनसैनिकांमध्ये हवी

- निवडणुकांच्या दरम्यान मनसैनिकांचे नाते समोर येतात

- निवडणुकींमध्ये व्यवहार झालेत, आता त्यांच्याशी कसा व्यवहार करायचा ते मी पाहतो

- लोकसभा, विधानसभेच्या मतावर गाफील राहिलो, जे झालं ते चांगलंच झालं

- कष्ट करणाऱ्या मनसैनिकांना सलाम

- २०१४ वेळी खरंच चमत्कार करून दाखवू

 

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="62746"]

 

[jwplayer mediaid="62761"]

 

[jwplayer mediaid="62766"]