ठाणे झेडपीतही राज यांचा सेनेला पाठिंबा!

ठाणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सेनेला साथ दिल्यानंतर आता ठाणे जिल्हा परिषदेतही हा ठाकरे पॅटर्न दिसणार आहे. या संदर्भातील माहिती मनसेचे आमदार रमेश पाटील यांनी दिली.

Updated: Mar 7, 2012, 07:52 PM IST

www.24taas.com, ठाणे

ठाणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सेनेला साथ दिल्यानंतर आता ठाणे जिल्हा परिषदेतही हा ठाकरे पॅटर्न दिसणार आहे. या संदर्भातील माहिती मनसेचे आमदार रमेश पाटील यांनी दिली.

ठाणे जिल्हा परिषेदत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि मनसे एकत्र येणार आहे. राष्ट्रवादीनं जिल्हात विकासकाम केली नसल्याचा आरोपही मनसेकडून करण्यात येतो आहे. १४ तारखेला जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

ठाणे जिल्हा परिषदेत एकूण जागा आहेत 66 आणि मॅजिक फिगर आहे 34.. राष्ट्रवादीला 26 जागा मिळाल्या असल्या, तरी सर्वात मोठा पक्ष असला तरी कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्यानं युतीनं सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

शिवसेनेचे 15 सदस्य, भाजपचे 11 सदस्य आणि मनसेचे 2 सदस्य एकत्र आल्यास हे संख्याबळ 31 होणार आहे. राष्ट्रवादीचे 5 सदस्य संपर्कात असल्याचा दावाही सेनेकडून करण्यात येतोय. तर आघाडीकडे हितेंद्र ठाकूर आणि एका अपक्षाच्या पाठिंब्यान 31 संख्याबळ होतय. अखेरच्या क्षणी माकपच्या 4 सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. थोडक्यात ठाणे महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही सत्तास्थापनेची चुरस निर्माण झाली आहे.