मनसे उमेदवारांना चिंता, मराठी मतदारांची वानवा

मीरा भाईंदर महापालिकेत सर्वच पक्षांमध्ये तिकिट वाटपावरून रणसंग्राम सुरू असतानाच मनसेनं इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. 95 जागांसाठी 140 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.

Updated: Jul 15, 2012, 05:48 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

मीरा भाईंदर महापालिकेत सर्वच पक्षांमध्ये तिकिट वाटपावरून रणसंग्राम सुरू असतानाच मनसेनं इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. 95 जागांसाठी 140 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. तर दुसरीकडे शहरात मराठी मतदारांची संख्या कमी असल्यानं मनसेला उमेदवारी देतांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

 

मनसचे नगरसेवकपदाचे इच्छूक उमेदवार एकाग्र चित्तानं परिक्षेसाठी बसलेले आहेत. 12 ऑगस्टला मीरा भाईंदर महापालिकेची निवडणूक होत आहे. निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी परीक्षार्थींना पास होणं गरजेचं आहे. 95 जागांसाठी 140 विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली. विशेष म्हणजे यातील 41 पदवीधर आहेत. हॉटल मॅनेजमेंट आणि एमबीए झालेले विद्यार्थीही परिक्षेला बसले होते.

 

गेल्या निवडणुकीत मनसेचे केवळ चार उमेदवार निवडून आले होते. शहरात मराठी मतदारांची संख्या कमी असल्यानं इतर पक्षांसोबत लढताना मनसेला मोठी कसरत करावी लागणार आहे. या निवडणुकीसाठी राज ठाकरे शहरात एक-दोन सभाही घेणार आहेत. त्यामुळे इतर महापालिकांप्रमाणे ही महापालिकादेखील मनसेसाठी प्रतिष्ठेची असणार आहे.