राज ठाकरे देणार का काँग्रेसला पाठिंबा?

राष्ट्रपतीपदाची निवडणूक उद्या होतेय आणि या निवडणुकीत काँग्रेसनं मनसेकडेही पाठिंबा मागितला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि काँग्रेसला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय.

Updated: Jul 18, 2012, 05:40 PM IST

www.24taas.com, मुंबई

राष्ट्रपतीपदाची निवडणूक उद्या होतेय आणि या निवडणुकीत काँग्रेसनं मनसेकडेही पाठिंबा मागितला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि काँग्रेसला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय.

पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत राज ठाकरे संध्याकाळी भूमिका ठरवणार आहेत. शिवसेनेनं एनडीएच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेऊन प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. प्रणव मुखर्जी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन आभार मानले होते.

राज्यात भाजप वगळता सर्वच पक्षांनी मुखर्जींना पाठिंबा दिलाय. आता मुख्यमंत्र्यांनी मनसेलाही पाठिंब्यासाठी आवाहन केलंय. त्यामुळे मनसे काय भूमिका घेते याकडे लक्ष आहे.