राज विरोधात नालंदा कोर्टात केस
बिहारचे मुख्य सचिव जर महाराष्ट्र पोलिसांवर कारवाई करणार असतील तर महाराष्ट्रातील प्रत्येक बिहारीला घुसखोर म्हणून हाकलून देऊ असा आक्रमक पवित्रा घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात नालंदा येथील जिल्हा कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे.
Sep 3, 2012, 09:22 PM ISTबिहारींनंतर दिल्लीतील नेतेही राजवर बरसले
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर दिल्लीतल्या नेत्यांनी जोरदार टीका केलीय. बसपा अध्यक्ष मायावतींनी राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी केलीय. देशात कुणीही कुठंही जाऊ शकतो, असं सांगत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी माध्यमांना धमकावणं अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलंय.
Sep 3, 2012, 07:36 PM ISTबिहारी नेत्यांवर बाळासाहेब कडाडले
बिहारी नेत्यांच्या विरोधात ठाकरे कुटुंबीय एकवटले आहेत. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केलंय. तसंच बिहारी नेत्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. दिग्विजय सिंग हे काँग्रेसमधील तमाशातील बिनपैशाचे नाचे असल्याची खरमरीत टीका केलीय.
Sep 3, 2012, 11:52 AM ISTराज धमकीला घाबरत नाही - नीतिशकुमार
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धमकींना आपण घाबरत नाही, अशी प्रतिक्रीया बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी दिली आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यांनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
Sep 2, 2012, 05:43 PM IST...तर, राज यांना मुंबईतून हाकलवू- रामदास आठवले
राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बिहारमधील मराठी माणसाला कोणी हात लावला तर राज ठाकरेंनाच मुंबईतून हाकलून देण्याची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा आरपीआय अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिलाय.
Sep 2, 2012, 04:24 PM ISTसर्व गुन्हेगार बिहारचेच- राज
आज रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरे यांनी पुन्हा परप्रांतियांवर निशाणा साधला.
Sep 2, 2012, 02:47 PM ISTपाक कलाकारांना का गोंजारायचं?- राज
ज्यावेळी पाकिस्तानी कलाकारांना परत जावं लागेल, तेव्हा त्यांना लाज वाटेल. दुसऱ्या देशात अशी वागणूक मिळाल्यावर ते आपल्या सरकारवर दबाव आणतील, की दहशतवाद थांबवा, कारण त्यामुळे दुसऱ्या देशांत आमची लाज जाते. त्यावेळी पाकिस्तानी सरकार दहशतवाद थांबवेल.
Sep 2, 2012, 02:20 PM ISTराज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडली
रंगशारदा सभागृहात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत खुमासदार भाषण केलं.
Sep 2, 2012, 01:54 PM ISTराज… बिहारमध्ये येऊन दाखवा - अबू आझमी
शुक्रवारी राज ठाकरेंनी बिहारच्या मुख्य सचिवांना केलेल्या मज्जावानंतर पलटवार करण्याची संधी सोडतील ते अबू आझमी कसले...
Sep 1, 2012, 06:23 PM IST'बिहारी राजचं मानसिक संतुलन ढासळलंय'
काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी आशा भोसले यांची माफी मागितली पाहिजे. राज यांचे मानसिंक संतूलन ढासळले असून वाटेल ते बोलत सुटले आहेत.
Sep 1, 2012, 02:05 PM ISTपाहा काय म्हणाले राज, मला फक्त महाराष्ट्रात रस !
आशाताई कसाबला म्हणतील की, अतिथी देवो भव !, पाक कलाकारांचा कार्यक्रम केल्यास खबरदार, आशाताई भारतातले सगळे कलाकार संपले का?
Aug 31, 2012, 01:39 PM ISTराज ठाकरे हाजीर हो... दिल्ली कोर्टाचा समन्स
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने समन्स बजावले आहे. 2008 रेल्वे भरतीवेळी परप्रांतियांना झालेल्या मारहाण प्रकरणी हे समन्स बजावण्यात आला आहे.
Aug 30, 2012, 06:34 PM ISTराजचा मोर्चा हिंदूचा विश्वासघात- बाळासाहेब
रझा अकादमीच्या कार्यक्रमात मनसेचे आमदार बाळा नांदगावकर सामील झाल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी मनसेच्या विराट मोर्चावर टीकास्त्र सोडले आहे. मोर्चा काढणारे पक्ष रझा अकादमीच्या कार्यक्रमात सहभागी होत असतील, तर हा हिंदूंचा विश्वासघात आहे, असा जोरदार हल्ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ` सामना ` च्या अग्रलेखातून केला आहे.
Aug 29, 2012, 07:58 PM ISTपोलिसांचे मनोधैर्य वाढवाः राज ठाकरे
पोलिसांचे मनोधैर्य वाढवा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांना दिला. मुंबईतील हिंसाचारानंतर पोलिसांना मार खावा लागला होता. तर महिला पोलिसांची छेड काढली गेली होती. याविऱोधात मनसे रस्त्यावर उतरत राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता.
Aug 27, 2012, 07:27 PM ISTराज ठाकरे मनसेच्या नगरसेवकांवर चिडले...
शहरात विरोधी पक्षाचे काही अस्तित्व आहे की नाही? शहराच्या प्रश्नांवर परस्पर निर्णय कसे घेतले जातात’, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढली.
Aug 26, 2012, 08:45 PM IST