संसदेतल्या गोंधळानंच केलं सचिनचं स्वागत!

राज्यसभेचा खासदार असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याची दिवशी राज्यसभेत हजेरी लावली. पहिल्याच दिवशी सचिन संसदेत हजर असल्यानं अर्थातच सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 5, 2013, 03:38 PM IST

www.24tass.com , झी मीडिया, नवी दिल्ली
राज्यसभेचा खासदार असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याची दिवशी राज्यसभेत हजेरी लावली. पहिल्याच दिवशी सचिन संसदेत हजर असल्यानं अर्थातच सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.
सचिन सोबत त्याची पत्नी अंजली ही सुद्धा संसदेत हजर होती. बॉलिवूडमधले प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या शेजारी सचिन बसला होता. तर अंजली गॅलरीत उपस्थित होती. संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला यांच्यासोबत सचिननं राज्यसभेत प्रवेश केला.

मात्र कामकाज सुरू होताच तेलंगणाच्या निर्णयावरून राज्यसभेत गोंधळ सुरू झाला आणि कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान, सचिननं पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेतली. एकूणच पहिल्याच दिवशी झालेल्या गोंधळानं सचिन स्वागत केलं असं म्हणावं लागेल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.