www.24tass.com , झी मीडिया, नवी दिल्ली
स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्यावरुन गोंधळातच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज सुरू झालं. गोंधळातच पहिले १२ आणि नंतर २ वाजेपर्यंत कामकाज स्थगितही झालं.
आजपासून सुरू झालेलं अधिवेशन ३० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या अधिवेशनात अन्नसुरक्षा विधेयकासह अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर सरकारला शिक्कामोर्तब करायचंय. भाजपसह अनेक पक्षांनी अन्नसुरक्षा विधेयकाला तत्वत: पाठिंबा दर्शवला आहे.
मात्र सीमांध्र भागामधील काही काँग्रेस आणी तेलगु देसम पक्षाच्या खासदारांनी सरकारच्या आंध्रप्रदेश विभाजित करून तेलंगणा राज्याच्या निर्मितीस दिलेल्या स्वीकृतीस जोरदार विरोध दर्शवत आपले राजीनामे दिलेत. अजून राजीनामे स्विकारण्यात आले असून खासदार आणि मंत्र्यांना समजावण्याचं काम काँग्रेस नेतृत्व करतंय.
लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी रुपयाच्या अवमुल्यनाबाबत आणि वाढत्या महागाईसह सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चेची मागणी केलीय. पावसाळी अधिवेशनात महत्त्वाची ४४ विधेयकं संसदेच्या पटलावर येणार आहेत. या कामकाजासाठी फक्त १२ दिवसच मिळणार आहेत. त्यामुळं गरज पडल्यास सरकार कामकाज वाढवण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.