युती

युतीबाबत दिल्लीत भाजपची बोलणी अधुरी

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतल्या निवास्थानी महाराष्ट्र राज्यातल्या भाजप नेत्यांच्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं उद्या पुन्हा भाजप नेत्यांची मुंबईत बैठक घेण्यात येणार आहे. 

Sep 16, 2014, 10:32 PM IST

'युती तुटेल असं पाऊल उचलणार नाही' - उद्धव

जागावाटपावरून भाजप आणि शिवसेना युतीत निर्माण झालेल्या तणावावर आपण काहीही नकारात्मक बोलणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. प्रत्येक वेळी जागावाटपावरून अशी स्थिती निर्माण होते की, युती तुटेल की काय?, पण शेवटच्या क्षणी नेहमी सर्व व्यवस्थित होतं. आणि युती अभेद्य राहते, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आह

Sep 15, 2014, 01:14 PM IST

अमित शहा येणार, शिवसेना नेत्यांना नाही भेटणार

शिवसेना भाजप युतीमध्ये बेबनाव होईल अशी चिन्हं निर्माण झालीत. एकीकडे जागा वाटपात निम्म्या जागा मिळाव्यात म्हणून भाजपचे नेते ठाम आहेत. शिवाय निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप अध्यक्ष अमित शहा 4 सप्टेंबरला मुंबईत येतायत. मात्र शिवसेना नेत्यांना ते भेटणार नसल्यानं युतीत आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sep 1, 2014, 07:29 PM IST

राज ठाकरेंना महायुतीचे दरवाजे कायमचे बंद - आठवले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडले असल्याने यांच्याकरता महायुतीचे दरवाजे कायम बंद असल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. 

Jul 29, 2014, 06:04 PM IST

'नारायण राणे यांना भाजपमध्ये घेणार नाहीत'

नारायण राणे यांना भाजपमध्ये घेणार नाहीत, मित्र पक्षांना त्रास देणाऱ्यांना पक्षात घ्यायचं नाही, हा युतीतील सामंजस्य करार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यामुळे नारायण राणे यांना भाजप म्हणजेच युतीत प्रवेश मिळणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Jul 17, 2014, 02:14 PM IST

शिवसेनेबरोबर युती तोडा, भाजपमध्ये मागणी

भाजपमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी पुढे आली आहे. मुंबईत सुरू असलेल्या कार्यकारिणी बैठकीत याबाबत जोरदार सूर उमटलाय. भाजपचे नेते मधू चव्हाण यांनी थेट भाषणातच हा मुद्दा छेडलाय... 

Jul 3, 2014, 06:54 PM IST

उद्या निवडणूक झाली तर युतीची सत्ता

देशभरातल्या मोदी लाटेत महाराष्ट्रातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची वाताहत झाली आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 245 मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळालीय.

May 18, 2014, 07:29 PM IST

संघाचा एक्झीट पोलः एनडीएला नाही संपूर्ण बहूमत

विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झीट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळणार असे दाखविले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने केलेल्या एक्झीट पोलमध्ये एनडीएला संपूर्ण बहुमत मिळणार नसल्याचे धक्कादायकरित्या समोर येत आहे.

May 14, 2014, 06:30 PM IST

टीएमसीत परिवहन समिती निवडणुकीत आघाडीची बाजी

ठाणे महानगरपालिका परिवहन समिती निवडणुकीत आघाडीनं बाजी मारलीय. भाजपचे सदस्य अजय जोशी यांना आपल्या बाजूनं वळवण्यात आघाडीला यश आलंय. त्यांनी आघाडीला मत दिलंय.

Dec 23, 2013, 12:23 PM IST

रिपाईला तीन जागा सोडण्याची युतीची तयारी

महायुतीतील तिसरा पार्टनर असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी लोकसभेच्या तीन जागा सोडण्याची तयारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवलीय.

Oct 4, 2013, 07:38 PM IST