युती

तीन दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार - फडणवीस

अखेर शिवसेना-भाजप एकत्र येणार, अशी शक्यता आहे. एका फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांमध्ये अखेर एकमत झालं असून नेतृत्त्वाकडून आज घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिलीये. 

Dec 2, 2014, 08:12 AM IST

भाजपची शिवसेनेला ४ कॅबिनेट, ७ राज्यमंत्रीपदाची ऑफर

भाजपनं शिवसेनेला ४ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्रीपदांची ऑफर दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांमध्ये चर्चेची आज आणखी एक फेरी होणार आहे. दरम्यान, भाजप-शिवसेनेची चर्चा सकारात्मक सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आज पुन्हा एकदा दोन्ही पक्षांचे नेते भेटणार आहेत. 

Dec 1, 2014, 01:54 PM IST

चर्चेचं गुऱ्हाळ: सेनेला १०-१२ मंत्रिपदं देण्यास भाजप तयार - सूत्र

शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा चर्चा सुरू झालीय. भाजप शिवसेनेला १०-१२ मंत्रिपदं देण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. काल रात्री उशीरा ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेना नेते अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

Dec 1, 2014, 09:11 AM IST

सेना-भाजप युतीमध्ये चर्चेचं घोडं पुन्हा अडलं?

सेना-भाजप युतीमध्ये चर्चेचं घोडं पुन्हा एकदा अडल्याचं चित्र आहे. शुक्रवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांनी एक पाऊलही पुढे टाकलेलं नाही. 

Nov 30, 2014, 03:42 PM IST

शिवसेना भाजप युती टिकली पाहिजे - मुख्यमंत्री फडणवीस

शिवसेना भाजप युती टिकली पाहिजे अशी इच्छा दोन्ही पक्षांची आहे असं विधान केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. सत्तेत एकत्र आणि बाकी विरोधात असं चित्र नको म्हणून भविष्याच्या दृष्टीने निर्णय होणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

Nov 29, 2014, 07:22 PM IST

शिवसेनेसोबत उद्यापासून चर्चा - देवेंद्र फडणवीस

भाजप आणि शिवसेनेने एकत्र यायला हवं, अशी प्रामाणिक इच्छा आहे. शिवसेनेशी सत्तासहभागाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Nov 27, 2014, 03:49 PM IST

भाजप-सेनेची बोलणी आता मंत्र्यांच्या शपथविधीवर अडली - सूत्र

शिवसेना-भाजप युतीसंदर्भात बोलणी पुन्हा सुरू झाल्याचं कळतंय. मात्र ही बोलणी आता बोलणी मंत्र्यांच्या शपथविधीवर अडली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

Nov 23, 2014, 09:16 PM IST

भाजप-शिवसेना युतीसाठी आता सरसंघचालकांचे प्रयत्न- सूत्र

सेना-भाजप युतीसाठी आता सरसंघचालक मोहन भागवतांनी प्रयत्न सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. युती बाबत शिवसेना आणि मोहन भागवतांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतं. 

Nov 16, 2014, 12:06 PM IST

भाजप-राष्ट्रवादी युती विरोधात भाजप कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन

राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी युती झाल्याने भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. याचा निषेध करण्यात सुरुवात केली आहे.  भाजप-राष्ट्रवादी युती विरोधात भाजप कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन केले.

Nov 14, 2014, 04:22 PM IST