'नारायण राणे यांना भाजपमध्ये घेणार नाहीत'

नारायण राणे यांना भाजपमध्ये घेणार नाहीत, मित्र पक्षांना त्रास देणाऱ्यांना पक्षात घ्यायचं नाही, हा युतीतील सामंजस्य करार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यामुळे नारायण राणे यांना भाजप म्हणजेच युतीत प्रवेश मिळणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Updated: Jul 17, 2014, 02:19 PM IST
'नारायण राणे यांना भाजपमध्ये घेणार नाहीत' title=

मुंबई : नारायण राणे यांना भाजपमध्ये घेणार नाहीत, मित्र पक्षांना त्रास देणाऱ्यांना पक्षात घ्यायचं नाही, हा युतीतील सामंजस्य करार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यामुळे नारायण राणे यांना भाजप म्हणजेच युतीत प्रवेश मिळणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे हे भाजपमध्ये जातील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती, अमित शहा यांची भेट घेतल्यापासून नारायण राणे हे भाजपमध्ये जातील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. नारायण राणे भाजपमध्ये जातील, या शक्यतेवर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलंय.

नारायण राणे भाजपमध्ये जाणार यावर मात्र, नारायण राणे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.