चांगल्या पावसानंतरही मुंबईकरांना दिलासा नाही

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. दक्षिण मुंबईमध्ये दुपारी सुमारे दोन तास मुसळधार पाऊस बरसला.

Updated: Jun 24, 2016, 08:37 PM IST
चांगल्या पावसानंतरही मुंबईकरांना दिलासा नाही title=

मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. दक्षिण मुंबईमध्ये दुपारी सुमारे दोन तास मुसळधार पाऊस बरसला. पण असं असलं तरी मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट कायम आहे. मुंबईकरांची 20 टक्के पाणी कपात कायम राहणार आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस न झाल्यामुळे ही पाणीकपात कायम राहिल. 

मुंबईमध्ये पुढच्या 24 तासांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. 

तर दुसरी कडे दुसरीकडे ठाण्यातही सकाळपासून पावसानं जोर धरला. पाचपाखाडी ,वंदना आणि राबोडी या ठिकाणी सखोल भागात पावसाचे पाणी साचले होते. पावसानं दुपारी उघडीप घेतली असली तरी संध्याकाळपर्यंत रिपरिप सुरूच होती. या पावसामुळे गारवा निर्माण झाला होता.