महेंद्र सिंह धोनी

टीम इंडियाचे बॅट्समन आणि बॉलर्स सीरिजमध्ये फेल

पाचव्या आणि शेवटच्या ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झालाय. एक डाव आणि 244 रन्सनं कॅप्टन कुकच्या इंग्लंड टीमकडून भारतीय टीमचा मानहानीकारक पराभव झालाय.

Aug 17, 2014, 09:42 PM IST

धोनीकडून टेस्टची कॅप्टन्सी काढून घ्यावी: मार्टिन क्रो

न्यूझीलंडचे महान बॅट्समन मार्टिन क्रो यांनी इंग्लंडमध्ये सध्या सुरू असलेल्या टेस्ट क्रिकेट सीरिजमध्ये महेंद्र सिंह धोनीच्या कॅप्टन्सीवर टीका केलीय. धोनीकडून टेस्टची कॅप्टन्सी काढून घ्यावी, असंही क्रो म्हणालेत. 

Aug 14, 2014, 09:02 PM IST

धोनी, कोहलीच्या नावाची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीला पद्मभूषण आणि धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीची पद्मश्री पुरस्कारासाठी बीसीसीआयनं शिफारस केली आहे. बीसीसीआयनं क्रीडामंत्रालयाकडे या दोघांच्या पुरस्कारासाठी ही शिफारस केलीय. 

Aug 13, 2014, 02:53 PM IST

कॅप्टन धोनी नामुष्कीचा रेकॉर्ड करण्याच्या मार्गावर

‘भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार’ असं बिरूद मिरविणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अनेक कौतुकास्पद रेकॉर्ड असले तरी, सध्या त्याची वाटचाल एका नामुष्कीजनक रेकॉर्डकडे सुरू आहे. 

Aug 11, 2014, 12:21 PM IST

“बरं झालं आता आरामाला दोन दिवस मिळाले”- धोनी

 मँचेस्टर टेस्टमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडनं धुव्वा उडवलाय. तीन दिवसातच टीम इंडियाचा इंग्लंडनं एक इनिंग आणि 54 रन्सनी दारुण केलाय. टीम इंडियाचे शेर तीन दिवसात ढेर झाले. या पराभवामुळे सीरिजमध्ये भारत 2-1 ने पिछाडीवर आहे. 

Aug 10, 2014, 08:01 AM IST

अँडरसननं धोनीलाही केली शिवीगाळ

भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अॅँडरसन यानं अत्यंत घाणेरडय़ा शब्दांत संबोधल्याचं वृत्त आहे. रवींद्र जडेजाचे दात तोडण्याची धमकी दिल्याचाही आरोप अँडरसनवर करण्यात आला होता. यामुळं तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क याच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

Aug 6, 2014, 01:16 PM IST

धोनीचा आणखी एक धमाका, मेसी-रोनाल्डोला टाकलं मागे

 ज्याच्या नेतृत्वात भारतानं क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्या कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीनं फुटबॉलचे सर्वात नामवंत खेळाडू लियोनेल मेसी आणि क्रिश्चियानो रोनाल्डोला मागे टाकलंय. फोर्ब्सनं आपल्या यादीत धोनीला जगातील सर्वात व्हॅल्यूबल खेळाडू म्हटलंय. टेनिस स्टार रॉजर फेडरल आणि गोल्फर टायगर वुड्स या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.

Jul 24, 2014, 03:26 PM IST

धोनीची कॅप्टनसी काढून घ्यायला हवी- चॅपेल

'टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा उमेदीचा काळ संपलाय. तो आता टेस्ट क्रिकेटचं नेतृत्व करण्याच्या कामाचा नाही. त्यामुळं भारताच्या कसोटी संघाची सूत्रं त्याच्याकडून काढून ती विराट कोहलीकडं द्यायला हवीत. ती वेळ आली आहे,' असं सडेतोड मत ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन इयान चॅपेल यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं भारतीय क्रिकेटमध्ये नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Jul 15, 2014, 04:37 PM IST

धोनीसह द्रविडची आजपासून पहिली 'टेस्ट'!

भारतच्या इंग्लंड दौऱ्याला आजपासून सुरुवात होतेय. पहिली टेस्ट ट्रेंटब्रिजमध्ये रंगणार आहे. 2011 च्या दौऱ्यात भारताला 4-0 नं सपाटून मार खावा लागला होता. या पराभवचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया आतूर असणार आहे. 

Jul 9, 2014, 01:06 PM IST

माझा निर्णय म्हणजे मनाचा आवाज आणि अनुभव: धोनी

परिस्थिती ओळखून त्यानुसार योग्य तो निर्णय घेणं म्हणजे महेंद्र सिंह धोनीची खासियत आहे. मात्र मागील सात वर्षात भारताला आपल्या कॅप्टनसीनं सर्वोच्च स्थानावर नेणारा खेळाडू म्हणतो त्याच्या अंतरात्माचा आवाज तर्क-वितर्कांवर आधारित आहे. धोनीनं आपल्या 33व्या वाढदिवसानिमित्त 2007मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्डकप पूर्वी सीनिअर खेळाडू असतांनाही महत्त्वाची जबाबदारी आणि आपल्या कप्तानी शैलीबाबत चर्चा केली. 

Jul 7, 2014, 04:21 PM IST

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी विरोधात अटक वॉरंट

आंध्र प्रदेश इथल्या अनंतपूरमधल्या जिल्हा कोर्टानं एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी विरोधात अटक वॉरंट काढलाय. याप्रकरणी पुढील सुनावणी 16 जुलैला आहे. 

Jun 24, 2014, 04:44 PM IST

धोनीच्या पार्टीत परदेशी क्रिकेटर्सनी चाखले भारतीय पदार्थ

गुजरातची दाल-बाटी, महाराष्ट्रात ज्याला बट्टी किंवा पानगे म्हणतात तो पदार्थ विदेशी क्रिकेटर्सनी चांगलाच चाखला. गेल्या गुरूवारी टीम इंडियाचा आणि आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं आपल्या घरी ‘शौर्य’ रांचीला पार्टी दिली. या पार्टीत चेन्नई सुपर किंग्जचे त्याचे टीम मेट्स होते.

May 5, 2014, 08:19 PM IST

धोनीचा फॅन आहे यो यो हनी सिंह!

आजकाल तरुण ज्याच्या तालावर नाचतात तो हनी सिंह मोठा फॅन आहे टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीचा. हनी सिंहनं हे स्वत: कबुल केलंय ते धोनीच्या शहरात रांचीमध्ये... तो म्हणाला मला खूप आनंद झालाय की मी धोनीच्या शहरात आहे.

Mar 31, 2014, 03:25 PM IST