अनंतपूर/ हैदराबाद: आंध्र प्रदेश इथल्या अनंतपूरमधल्या जिल्हा कोर्टानं एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी विरोधात अटक वॉरंट काढलाय. याप्रकरणी पुढील सुनावणी 16 जुलैला आहे.
टीम इंडियाचा कॅप्टन धोनीविरोधात हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याचा आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. एका जाहिरातीत धोनीला विष्णू या हिंदू देवाच्या रुपात दाखवण्यात आलं होतं. धोनीच्या अनेक हातांमध्ये विविध प्रॉडक्ट दाखवण्यात आली होती. धोनी ज्या प्रॉडक्टची जाहिरात करतो अशाच प्रॉडक्टचा कव्हरपेजच्या फोटोत समावेश करण्यात आला होता. हा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या श्याम सुंदर यांनी कोर्टात धाव घेतली.
केसच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं वारंवार धोनीला समन्स बजावले मात्र सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळं त्याच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलंय. धोनी विरोधात कव्हरपेज प्रकरणात दिल्ली, पुण्यासह देशातील अन्य शहरांमध्येही केस दाखल झाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.