एलियन अमेरिकेच्या संपर्कात? समुद्रात 100 वेळा UFO चे लँडिग; आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा

Aleins : एलियन्सबद्दल आपण नेहमीच ऐकलंय. त्यांच्या अस्तित्वावरून वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जातात. आता मात्र, एलियनच्या अस्तित्वाबाबत अत्यंत खळबजनक दावा करण्यात आला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Nov 17, 2024, 07:29 PM IST
एलियन अमेरिकेच्या संपर्कात? समुद्रात 100 वेळा UFO चे लँडिग; आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा    title=

Aleins Danny Sheehan:  एलियन्सबद्दल तुम्हा-आम्हाला नेहमीच कुतूहल वाटत आलंय. एलियन्सच्या अस्तित्वावरून संशोधकांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आजपर्यंत कोणीही एलियनचे अस्तित्व पुराव्यानिशी सिद्ध करुन शकलेले नाही. आता मात्र, एलिनच्या अस्तित्वाबाबत सर्वात मोठा दावा करण्यात आला आहे.  एलियन अमेरिकेच्या संपर्कात असून एलियनच्या अस्तित्वाबाबतची माहिती जगापासून लपवून ठेवण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. पृथ्वीवर एलियन राहत असून  समुद्रात 100 वेळा UFO चे लँडिग पाहण्यात आल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीने हा दावा केला आहे. 

हे देखील वाचा.... 2025 ची सुरुवात महाभयंकर! 2043 मध्ये मुस्लिम राजवट... बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी

डॅनी शीहान (Danny Sheehan) असे या व्यक्तीचे नाव आहे. डॅनी शीहान हा  यूएफओ व्हिसलब्लोअर्सशी संबंधित आहे. यूएफओ व्हिसलब्लोअर्स च्या यूनाइटेड स्टेट्स कांग्रेस परिषदेत डॅनी शीहान सहभागी होणार आहेत. त्याआधीच डॅनी शीहान यांनी एलियनच्या अस्तित्वाबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. अमेरिकेत समुद्राच्या तळाशी एक गुप्त बेस कॅम्प तयार करण्यात आला आहे. अमेरिका सरकार या गुप्त बेस कॅम्पच्या मदतीने UFO तसेच एलियनच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे. डेली स्टारने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

हे देखील वाचा... पृथ्वीच्या आत एका खडकात सापडला विशाल महासागर; जमिनीवरील समुद्राच्या तिप्पट पाण्याचा साठा

समुद्राच्या तळाशी एलियन राहत असल्याचा दावा डॅनी शीहान यांनी केला आहे. इतकचं नाही तर डॅनी शीहान यांनी याचे लोकशन देखील सांगितले आहे. न्यू पॅराडाइम इन्स्टिट्यूटच्या सादरीकरणात डॅनी शीहान यांनी एलियच्या वास्तवाबाबात अनेक स्फोटक खुलासे केले आहेत. यूएसएस निमित्झ बॅटल ग्रुपशी संलग्न पाणबुडीच्या माध्यमातून UFO तसेच एलियनच्या हालचालींचे निरिक्षण केले जात आहे. अमेरिकेतील साइट ग्वाडालुप (Isla Guadalupe, Baja) जवळ तसेच लॉस एंजेलिस, कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेस समुद्राच्या तळाशी एलियनचे वास्तव्य आहे. या ठिकाणी समुद्रात 100 पेक्षा अधिक वेळा UFO चे लँडिग झाले असल्याचा दावा डॅनी शीहान यांनी केला आहे. येथे अनेक प्रकारचे दुर्लभ जीव आढळून आले असून अशा प्रकारचे जीव पृथ्वीवर इतर कुठेच आढळून आलेले नाहीत. मात्र, एलियन बाबात कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.