ना जुगार, ना लॉटरी तरी 338 कोटींची कमाई आणि ती ही अवघ्या 16 मिनिटात! 27 वर्षीय तरुणाने नेमकं केलं काय?

27 Year Old Wins 338 Crore Rs As Prize: या सामन्याआधी 27 वर्षीय तरुणाने त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडून कानाखाली खाल्ली. त्यानंतरही त्याने सामना संपल्यावर आपल्या विरोधकासमोर नतमस्तक होण्याचं सौजन्य दाखवल्याचं पाहायला मिळालं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 17, 2024, 07:00 AM IST
ना जुगार, ना लॉटरी तरी 338 कोटींची कमाई आणि ती ही अवघ्या 16 मिनिटात! 27 वर्षीय तरुणाने नेमकं केलं काय? title=
सगळीकडे सध्या त्याचीच चर्चा

27 Year Old Wins 338 Crore Rs As Prize: जॅक पॉलने प्रसिद्ध बॉक्सिंगपटू माईक टायसनचा पराभव केला आहे. एकमताने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार 8 बाऊटमध्ये झालेल्या फाईटनंतर टायसनला विजयी घोषित करण्यात आलं. नेटफ्लिक्सने आयोजित केलेला हा सामना डल्स टेक्सास येथे झाला. पॉलने पहिले दोन बाऊट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अनऑफिशीएल स्कोअरकार्डमध्ये पॉलने टायसनवर 78-74 अशी आघाडी मिळवल्याचं स्पष्ट झालं. 

वजन करतानाच लगावली कानाखाली

तब्बल 19 वर्षानंतर माईक टायसन हा बॉक्सिंग रिंगमध्ये उतरला होता. तर पॉल या सामन्यामध्ये उतरण्याआधी त्याची कामगिरी 10-1 अशी होती. याच वर्षी जून महिन्यात हा सामना होणार होता. मात्र काही कारणाने तो पुढे ढकलून नोव्हेंबरमध्ये खेळवण्यात आला. सामना सुरु होण्याआधी वजन करताना टायसनने पॉलच्या कानाखाली लगावल्याने वाद निर्माण झाला. तसेच पराभवानंतरही त्याने आपला पराभवच झाला नसल्याचा दावाही त्याने केला. फाइटच्या आधी दोघांनाही आपणच जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता. 

वयामुळे टायसन पराभूत

सामन्याला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन बाऊटमध्ये टायसन सहज जिंकेल असं वाटत होतं. पॉलला सेट होण्यासाठी वेळ लागला. मात्रनंतर टायसन वयामुळे आणि थकवा आल्याने संथ पडला. टायसनचे पायच हलत नव्हते असं अनेकांनी सामन्यानंतर म्हटलं. टायसनच्या पहिल्याच फटक्यात पॉल रिंगच्या रोपवर पडला. चौथ्या राऊंडला टायसन संथ होऊ लागला. मात्र त्याचवेळी पॉलने हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यानंतर टायसनला सावरताच आलं नाही. 

दोघांची संपत्ती नेमकी किती? किती पैसा आता मिळाला

युट्यूब बॉक्सर म्हणून प्रसिद्द असलेल्या 27 वर्षीय पॉलने 58 वर्षीय टायसनला पराभूत केल्यानंतर पॉलला बक्षीस म्हणून तब्बल 40 मिलियन अमेरिकी डॉलर्स मिळाले आहेत. भारतीय चलनानुसार ही रक्कम 338 कोटी रुपये इतकी होते. विशेष म्हणजे 2 मिनिटांचा एक याप्रमाणे एकूण 8 राऊंड या दोघांमध्ये खेळवण्यात आले. म्हणजेच अवघ्या 16 मिनिटांच्या सामन्यांमध्ये पॉलने 338 कोटी रुपये कमवले. या रक्केमच्या अगदी अर्धी रक्कम टायसनला मिळाली आहे. हा सामना होण्याआधी पॉलची एकूण संपत्ती 80 मिलियन अमिरेकी डॉलर्स इतकी होती. तर टायसनची संपत्ती 10 मिलियन अमेरिकी डॉलर इतकी होती. त्यांच्या संपत्तीमध्ये बरीच भर पडली आहे.

नेटफ्लिक्सची सेवा खंडित

विशेष म्हणजे पराभूत झाल्यानंतरही पॉल टायसनसमोर नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळालं. पॉल आणि टायसनचा सामना पाहण्यासाठी नेटफ्लिक्सवर तब्बल 120 मिलियन लोकांनी एकाच वेळी हजेरी लावल्याने प्लॅटफॉर्मवरील सेवा खंडित झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकांना हा सामना या तांत्रिक अडचणीमुळे पाहताच आला नाही. तर काहींना तर संपूर्ण अॅप्लिकेशनच बंद असल्याच्या समस्येला तोंड द्यावं लागलं.