अँडरसननं धोनीलाही केली शिवीगाळ

भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अॅँडरसन यानं अत्यंत घाणेरडय़ा शब्दांत संबोधल्याचं वृत्त आहे. रवींद्र जडेजाचे दात तोडण्याची धमकी दिल्याचाही आरोप अँडरसनवर करण्यात आला होता. यामुळं तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क याच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

ANI | Updated: Aug 6, 2014, 01:17 PM IST
अँडरसननं धोनीलाही केली शिवीगाळ   title=

लंडन : भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अॅँडरसन यानं अत्यंत घाणेरडय़ा शब्दांत संबोधल्याचं वृत्त आहे. रवींद्र जडेजाचे दात तोडण्याची धमकी दिल्याचाही आरोप अँडरसनवर करण्यात आला होता. यामुळं तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क याच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

अॅँडरसन-जडेजा वादाच्या सुनावणीची काही माहिती भारतीय पत्रकारांना मिळाली असून, यात अॅँडरसन दोषी असल्याचं स्पष्ट कळतं. अँडरसननं रवींद्र जाडेजालाच नाही तर कर्णधार धोनीलाही शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ मीडियाचा हाती लागल्याचं समजतंय. 

सुनावणी दरम्यान खुलासा करण्यात आला की, ​जाडेजाला धमकावल्यानंतर धोनीनं अँडरसनला चांगलंच सुनावलं होतं. 'तू जर भारतीय ड्रेसिंग रुमच्या दिशेनं एक जरी पाऊल पुढं टाकलं तर मी तुझा जीव घेईन.' अशा प्रकारचा धमकीवजा इशाराच धोनीनं त्याला दिला होता. यावर अँडरसनही चांगलाच खवळला आणि त्याने धोनीला 'F****** C***' शिवीगाळ केली. 

न्यायिक आयुक्त गोर्डान लेविस यांनी अॅँडरसन आणि जडेजा या दोघांनाही दोषमुक्त केलं असलं, तरी या वादामुळं क्रिकेटरसिकांनामात्र धक्का बसला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.