बेपत्ता

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन १० दिवसांपासून बेपत्ता

जगातल्या शक्तिशाली देशांपैकी एक अशी रशियाची ओळख आहे. याच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. गेल्या सात दिवसांत व्लादिमीर पुतिन यांचे अनेक कार्यक्रम पूर्वनियोजित होते. मात्र त्यापैकी कुठल्याच कार्यक्रमाला पुतिन हजर राहू शकले नाहीत.

Mar 15, 2015, 12:51 PM IST

हिंजवडीत ३ दिवसांपासून ३ महिला बेपत्ता

हिंजवडीत ३  दिवसांपासून एकाच वेळेस ३ महिला बेपत्ता आहेत, मात्र यांचा कोणताही तपास लागत नसल्याने या महिलांचं अपहरण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

Dec 1, 2014, 06:43 PM IST

इराकमधील बेपत्ता भारतीयांचा शोध सुरु - सुषमा स्वराज

इराकमध्ये बेपत्ता झालेल्या भारतीयांचा शोध सुरु असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत दिली.

Nov 28, 2014, 06:59 PM IST

१८ वर्षापूर्वी बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला

श्रीनगर: १९९६ साली उत्तर प्रदेशमधील मेनपुरी येथे राहणारे राजपूत युनिटचे हवलदार गया प्रसाद हे अचानक गायब झाले होते. जम्मू-कश्मीरच्या सियचिन ग्लेशियरवर त्यांना तैनात केलं गेलं होतं. 

Aug 21, 2014, 09:41 PM IST

110 प्रवाशांचं अल्जेरियन विमान कोसळलं

अल्जेरियाच्या हवाई वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे, त्यांचा एअर अल्जेरी विमानाशी संपर्क तुटला आहे. 

Jul 24, 2014, 05:30 PM IST

भारतीयानं शोधला मलेशियाच्या `त्या` विमानाचा ठावठिकाणा?

मलिशियाच्या बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध गेल्या १२ दिवसांपासून सुरू आहे परंतु अद्याप या विमानाचा ठावठिकाणा लागलेला नाही. परंतु, याच दरम्यान एका भारतीय व्यक्तीनं या बेपत्ता विमानाचं लोकेशन शोधून काढण्याचा दावा केलाय.

Mar 19, 2014, 12:34 PM IST

मलेशियाच्या `त्या` विमानाचं अपहरण - वृत्तसंस्था

गेल्या आठ दिवसांपासून गायब असलेलं मलेशिया एअरलाईन्सचं `एमएच३७०` या विमानाचं अपहरण झाल्याचं जाहीर करण्यात आलंय. या विमानात २३९ प्रवासी आहेत.

Mar 15, 2014, 10:43 AM IST

मुंबईच्या `लाईफलाईन`मधून दररोज एक जण बेपत्ता

मुंबईची लाईफ-लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेमधून दररोज एक व्यक्ती गायब होते... हे धक्कादायक सत्य उघड केलं `जीआरपी`च्या आकड्यांनी...

Feb 11, 2014, 05:15 PM IST

अभिनेत्री अलका पुणेवार सापडली, अपघाताचा बनाव उघड

गेले ११ दिवस बेपत्ता असलेल्या अभिनेत्री अलका पुणेवार बेपत्ता प्रकरणाचा त्यांच्या ड्रायवरला ताब्यात घेतल्यानंतर अखेर उलगडा झाला आहे. अलका पुणेवार या सुखरूप चेन्नईत सापल्या असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी ठाणे पोलिसांची दोन पथक रवाना करण्यात आल्याची माहीती ठाणे पोलिसांनी दिली आहे.

Jan 7, 2014, 07:39 PM IST

मराठी अभिनेत्री अलका पुणेवार बेपत्ता प्रकरणाचं गूढ वाढलं

मराठी अभिनेत्री अलका पुणेवार या मागील आठवड्यापासून बेपत्ता आहेत. अलका पुणेवार यांची गाडी खोपोलीत खोल दरीत आढळली आहे.

Jan 3, 2014, 04:28 PM IST

श्रुतिका स्केटिंग मास्टर, लिम्काबुकमध्ये विक्रमाची नोंद

श्रुतिका चंदवानी ही मूळची कोल्हापूरची. श्रुतिका (२२) ही स्केटिंगमध्ये मास्टर होती. तिच्या विक्रमाची नोंद लिम्काबुकमध्ये करण्यात आली आहे.

Nov 8, 2013, 04:41 PM IST

‘त्या’ चार मित्रांना मिळाली जलसमाधी

पुण्यातून बेपत्ता झालेल्या चार मित्रांचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश मिळालंय. या चारही मित्रांना जलसमाधी मिळाली. चौघांचेही मृतदेह नीरा नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अचानक बेपत्ता झालेल्या चार मित्रांच्या गाडीचा शोध लागला. याच गाडीत तिघांचे मृतदेह आढळले आहेत.

Nov 7, 2013, 01:49 PM IST

‘त्या’ तरुणांची गाडी सापडली, तिघं कुठे?

पुण्यातून बेपत्ता झालेल्या चार मित्रांचं गूढ उलगडण्याची शक्यता आहे. अचानक बेपत्ता झालेल्या चार मित्रांच्या गाडीचा शोध लागलाय. नीरा नदीच्या पात्रात दोन पुलांच्यामध्ये पाण्याखाली ही गाडी सापडलीय.

Nov 7, 2013, 01:10 PM IST

श्रुतिकानं सांगितलं मी कोल्हापूरला येतेय, पण...

पुण्यातून पाच दिवसांपूर्वी गायब झालेल्या चौघांपैकी एक तरुण, चिंतन बूच याचा मृतदेह सापडलाय. नीरा नदीमध्ये त्याचा मृतदेह सापडलाय. पुणे पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. मात्र अन्य दोन तरुण आणि एका तरुणीबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, श्रुतिकानं आदल्याच दिवशी नोकरीचा राजीनामा दिला होता. आणि दुस-या दिवशी घरी येणार, असं कोल्हापूरला घरच्यांना कळवलं होतं. पण दुस-या दिवळी श्रुतिका पोहोचलीच नाही.

Nov 6, 2013, 10:34 PM IST