१८ वर्षापूर्वी बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला

Updated: Aug 21, 2014, 09:41 PM IST
१८ वर्षापूर्वी बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला title=
श्रीनगर: १९९६ साली उत्तर प्रदेशमधील मेनपुरी येथे राहणारे राजपूत युनिटचे हवलदार गया प्रसाद हे अचानक गायब झाले होते. जम्मू-कश्मीरच्या सियचिन ग्लेशियरवर त्यांना तैनात केलं गेलं होतं. 
सियाचिन ग्लेशियरवर १८ वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या या भारतीय लष्कराच्या जवानाचा मृतदेह मागील आठवड्यात भारतीय लष्कराला सापडला आहे.

''हा मृतदेह गया प्रसाद यांचाच आहे याची ओळख झाल्यानंतर त्यांचे पार्थीव हवाई मार्गाने चंडीगडला नेण्यात येईल आणि त्यानंतर लष्कराच्या वाहनांतून त्यांच्या उत्तर प्रदेशातील मूळ गावी मेनपुरी येथे आणण्यात येणार आहे. गया प्रसाद यांचा मृत्यू कसा झाला याची माहिती अजुनतरी समोर आलेली नाही. पण हिमकडा कोसळल्यामुळे गया प्रसाद यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.'' अशी माहिती लष्कराच्या एका अधिका-यांनी दिली. 

५ हजार ७०० मीटर उंची असणारा सियाचिन ग्लेशियरचा हा प्रदेश जगातील सर्वात उंच भाग म्हणून ओळखला जातो. १९८४ पासून सियाचिन ग्लेशियरवर भारत आणि पाकिस्तान या दोघांचे सैन्य तैनात आहेत. या सियाचीन ग्लेशियरच्या भागात आजपर्यंत हजारांहून जास्त जवानांचा मृत्यू झाला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.