बांग्लादेश

पेटून उठला संगकारा, ठोकली डबल सेन्चुरी

श्रीलंकेचा धुव्वाँधार खेळाडू कुमार संगकारानं आपल्या करिअरमधली नववी डबल-सेन्चुरी ठोकलीय. आज, श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश विरुद्ध टेस्ट मॅचचा दुसरा दिवस सुरू आहे. लंचब्रेकपर्यंत श्रीलंकेचा स्कोअर आहे, ४८०/७.

Feb 5, 2014, 01:00 PM IST

तर बंगालचा बांग्लादेश होईल- तस्लिमा नसरिन

बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरिन पश्चिम बंगाल सरकारच्या भुमिकेमुळं त्रस्त आहेत. लेखकावर बंधन म्हणजेच त्या लेखकाचा मृत्यू आहे. त्यामुळं कोलकात्याला परतण्याची आशाच उरलेली नाही.

Feb 3, 2014, 09:17 PM IST

नाटक संपलं...`मीरपूरच्या हैवाना`ची फाशीची शिक्षा कायम!

बांग्लादेशच्या सुप्रीम कोर्टानं १९७१ साली मानवता विरोधी गुन्ह्यासाठी ‘जमात-ए-इस्लामी’ या पक्षाच्या धर्मांध नेत्याची – अब्दुल कादिर मुल्लाची – फाशीची शिक्षा कायम ठेवलीय.

Dec 12, 2013, 05:21 PM IST

तब्बल १५२ सैनिकांना फाशीची शिक्षा

बांग्लादेशात तब्बल १५२ सैनिकांना न्यायालयाने मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांना बंड करणे आणि लष्करी अधिकाऱ्यांची हत्या केल्याच्या आरोपावरून दोषी ठरविण्यात आले होते.

Nov 6, 2013, 05:39 PM IST

टी-२० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, पाकची गाठ भारतासोबत!

पुढील वर्षी बांगलादेश इथं होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी आयसीसीनं वेळापत्रकाची घोषणा केली आहे. १६ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या २२ दिवसांच्या टी-२० चॅम्पियनशीपमध्ये टीम इंडियाची ओपनिंग मॅच असणार आहे ती पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी.

Oct 27, 2013, 04:20 PM IST

नवा वर्ल्ड रेकॉर्ड : एका ओव्हरमध्ये 39 रन्स

क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ असं म्हटलं जातं... अशीच एक अशक्य कोटीतली गोष्ट सत्यात उतरलीय. बांग्लादेशचा क्रिकेटर अलाउद्दीन बाबूनं विरुद्ध टिमला एका ओव्हरमध्ये चक्क 39 रन्स करण्याची संधी दिली. यामुळे अलाउद्दीनच्या नावावर एका नव्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झालीय.

Oct 3, 2013, 08:14 AM IST

बांग्लादेशात विरोधी पक्षावरच बंदी

जमात-ए-इस्लामी हा बांग्लादेशातील सर्वात मोठा कट्टर उजव्या विचारसरणीचा पक्ष बेकायदेशीर असल्याचा निर्णय ढाका उच्च न्यायालयाने दिला. तसेच या पक्षाला निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निकालामुळे देशातील शक्तिशाली मूलतत्त्ववादी पक्षाला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे या पक्षाचे असित्वच संपुष्टात आले आहे.

Aug 2, 2013, 08:04 AM IST

बांग्लादेशात हिंदूंसाठी नवा कायदा!

बांग्लादेश कॅबिनेटनं हिंदू धार्मिक संपत्तीचा विकास तसंच या संपत्तीचा बेकायदेशीर गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी एका नव्या कायद्याला मान्यता दिलीय. कॅबिनेटनं या कायद्याच्या अंतिम मसुद्याला मान्यता दिलीय.

Jun 12, 2013, 03:57 PM IST

तस्लिमांचे इस्लामविरोध वक्तव्य

बांग्लादेशात इस्लाम धर्माच्या संरक्षणासाठी नवा कायदा लागू करावा, यासाठी हिफाजत- ए- इस्लाम संघटनेने जाळपोळ केली आहे. नास्तिकांना ठार करण्यात यावं, असा कायदा करण्याची मागणी या संघटनेने केली आहे.

May 6, 2013, 04:41 PM IST

आठ मजली इमारत कोसळून ८० ठार

बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये एक आठ मजली इमारत कोसळून ८० लोकांचा बळी गेला. इमारत दुर्घटनेत ७०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

Apr 24, 2013, 08:29 PM IST

‘शेजार’वैर नाही फायद्याचं!

पाकिस्तानातून येणारे सशस्त्र दहशतवादी, बांग्लादेशातून मोठ्या प्रमाणावर होणारी घुसखोरी, नेपाळमधून होणारी ग्राहकोपयोगी वस्तू व बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी, म्यानमार-बांगलादेश, भूतानमधील तळांच्या माध्यमातून उल्फा व इतर दहशतवादी गटांनी भारतामध्ये सुरू ठेवलेल्या कारवाया यामध्ये २०१२ मध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे भारतीय सीमा आणखी असुरक्षित बनल्या आहेत.

Jan 9, 2013, 03:56 PM IST

भारत-पाकिस्तानची पुन्हा एकदा धडक निश्चित!

पल्लीकल स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या पाकिस्तान विरूद्ध बांग्लादेश मॅचमध्ये पाकिस्तानने बांग्लादेशचा ८ विकेट्स आणि ८ बॉल्स राखून दणदणीत पराभव करताना दिमाखात सुपर-८ फेरी गाठलीय.

Sep 26, 2012, 01:32 PM IST

'आसाममधील हिंसाचाराला बांग्लादेशीच जबाबदार!'

भाजपाचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी यांनी मंगळवारी आसाममधील जातीय दंगल आणि हिंसाचारासाठी बांग्लादेशी प्रवाशांना जबाबदार धरलं आहे. आडवाणी सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत.

Aug 1, 2012, 09:34 AM IST