आठ मजली इमारत कोसळून ८० ठार

बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये एक आठ मजली इमारत कोसळून ८० लोकांचा बळी गेला. इमारत दुर्घटनेत ७०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 24, 2013, 08:29 PM IST

www.24taas.com, ढाका

बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये एक आठ मजली इमारत कोसळून ८० लोकांचा बळी गेला. इमारत दुर्घटनेत ७०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

ढाक्यातील राणा प्लाझा ही आठ मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकलेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. यापैकी काही जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. बचाव कार्य सुरू आहे. आत्तापर्यंत इमारतीच्या ढिगाऱ्यातून १०० हून अधिक जखमींना बाहेर काढण्यात आलं आहे.
या आठ मजली इमारतीमध्ये तीन कापडाची, एक बॅंकेची शाखा होती. तसेच ३०० पेक्षा जास्त छोटी-मोठी दुकाने होती. या इमारतीला मंगळवारी भेगा पडल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने, यामध्ये आत्तापर्यंत ८० जणांना जीव गमवावा लागला आहे.