www.24taas.com, झी मीडिया, ढाका
बांग्लादेश कॅबिनेटनं हिंदू धार्मिक संपत्तीचा विकास तसंच या संपत्तीचा बेकायदेशीर गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी एका नव्या कायद्याला मान्यता दिलीय. कॅबिनेटनं या कायद्याच्या अंतिम मसुद्याला मान्यता दिलीय.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकार हिंदू कल्याणकारी निधी किंवा देवोत्तर संपत्तीची सूची बनवणार आहे. तसंच संसंदेच्या सध्याच्या आर्थिक सत्रादरम्यान हा कायदा संमत झाल्यानंतर समितीच्या बोर्डाचीही निवड करण्यात येईल.
हिंदू कायद्याचे विशेतज्ज्ञ राणा दासगुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटिश काळापासून मुस्लिम वक्फ स्थळांवरील व्यवस्था आणि संरक्षणासाठी सध्या कायदे अस्तित्वात आहेत. हिंदूंच्या संपत्तीसाठी मात्र कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे आम्ही या नव्या कायद्याचं स्वागतच करतो. मंदिरांशी जोडल्या गेलेले हजारो जमीनींचे तुकडे याआधीच बेकायदेशीररित्या बळकावण्यात आलेत पण ही जमीन सोडवण्यासाठी मात्र कोणतेही कायदे नाहीत.
दरम्यान, ढाकाच्या जवळ प्रस्तावित बंदराच्या निर्माणासाठी देशाच्या कायद्यांचं पूर्ण पालन केलं जाईल, असं आश्वासन भारतानं बांग्लादेशला दिलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.