तर बंगालचा बांग्लादेश होईल- तस्लिमा नसरिन

बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरिन पश्चिम बंगाल सरकारच्या भुमिकेमुळं त्रस्त आहेत. लेखकावर बंधन म्हणजेच त्या लेखकाचा मृत्यू आहे. त्यामुळं कोलकात्याला परतण्याची आशाच उरलेली नाही.

Updated: Feb 3, 2014, 09:24 PM IST

www.24taas.com , झी मीडिया , नवी दिल्ली
बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरिन पश्चिम बंगाल सरकारच्या भुमिकेमुळं त्रस्त आहेत. लेखकावर बंधन म्हणजेच त्या लेखकाचा मृत्यू आहे. त्यामुळं कोलकात्याला परतण्याची आशाच उरलेली नाही.
कोलकात्याच्या पुस्तक प्रदर्शनात तस्लिमा नसरिन यांचं `निशिद्धो` हे पुस्तक उपलब्ध आहे. पण त्यांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. यापूर्वी २०१२ला झालेल्या पुस्तक प्रदर्शनात तस्लिमा नसरिन यांच्या `निर्बासन` या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रद्द करण्यात आला होता. आपलं पुस्तक यावेळी देखिल प्रर्दशनातून हटवण्यात येईल, अशी भीती नसरिन यांनी व्यक्त केलीय. पश्चिम बंगालमधील परिस्थिती बदललेली नाही. पश्चिम बंगालमधील परिस्थिती जर अशीच राहीली तर एक दिवस बंगालचा बांग्लादेश होईल.
गेली तीन दशकं आपण स्त्रियांच्या प्रश्नावर आवाज उठवतोय. मात्र आपल्या आयुष्यात तीन स्त्रियांमुळे अडचणी निर्माण झाल्याची अशी खंत तस्लिमा नसरिन व्यक्त करतात. आपल्या आयुष्यात अडचणी निर्माण केल्याबद्दल ममता बॅनर्जी, बांग्लादेशच्या शेख हसीना आणि बेगम खालिदा झिया यांच्यावर तस्लिमा नसरिन यांनी रोष व्यक्त केला आहे.
तसेच स्त्रियांच्या प्रश्नावर लढा देण्यासाठी `आम औरत पार्टी` असावी अशी प्रतिक्रिया तस्लिमा नसरिन देतात.
मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाच्या पराभवामुळं ममता यांचा पक्ष सत्तेवर आल्यावर पश्चिम बंगालमधील परिस्थितीत फरक पडेल असं आपल्याला वाटलं होतं. आता मात्र बांग्लादेश आणि पश्चिम बंगालमधील परिस्थितीत एकसारखीच आहे, असं तस्लिमा नसरिन यांना वाटतं.
कोलकात्याला आपण परत येऊ शकत नाही. आपलं कोलकात्याच्या संस्कृतीशी असलेलं नातं अतुट आहे. आपले शरीर मरणौत्तर कोलकात्यातील मेडिकल कॉलेजला दान करण्याचा निर्णय नसरिन यांनी घेतला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.