तस्लिमांचे इस्लामविरोध वक्तव्य

बांग्लादेशात इस्लाम धर्माच्या संरक्षणासाठी नवा कायदा लागू करावा, यासाठी हिफाजत- ए- इस्लाम संघटनेने जाळपोळ केली आहे. नास्तिकांना ठार करण्यात यावं, असा कायदा करण्याची मागणी या संघटनेने केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 7, 2013, 01:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ढाका
बांग्लादेशात इस्लाम धर्माच्या संरक्षणासाठी नवा कायदा लागू करावा, यासाठी हिफाजत- ए- इस्लाम संघटनेने जाळपोळ केली आहे. नास्तिकांना ठार करण्यात यावं, असा कायदा करण्याची मागणी या संघटनेने केली आहे. या घटनेचा बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरिन यांनी आपल्या ब्लॉगमध्य़े तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
हिफाजत-ए-इस्लाम संघटनेचे लोक रस्त्यांवर उतरुन घरं, दुकानं आणि वाहनं जाळत आहेत. अशा लोकांना फाशी देण्यात यावी. सरकारही अल्लाला न मानणाऱ्यांना तुरुंगात टाकत आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. हिफाजत-ए- इस्लामचे कार्यकर्ते नास्तिकांची हत्या करू इच्छितात. असे कायदे चुकीचे आहेत. असंच घडत राहिलं तर बांग्लादेश अत्यंत फालतू देश बनेल. असं तसलिमा नसरीन यांनी म्हटलं आहे.

अल्लाला जर स्वतःच्या धर्माचं रक्षण करता येत नाही, म्हणून हे लोक धर्म रक्षणासाठी तोडफोड करत आहेत असा सणसणीत आरोप तसलिमा नसरीन यांनी केला आहे. इतकंच नव्हे, तर इस्लाम धर्म अपंग झाला असून त्याला जिवंत राहाण्यासाठी इतरांची मदत लागते, अशी टीकाही तसलिमा नसरीन यांनी केली आहे.