www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ असं म्हटलं जातं... अशीच एक अशक्य कोटीतली गोष्ट सत्यात उतरलीय. बांग्लादेशचा क्रिकेटर अलाउद्दीन बाबूनं विरुद्ध टिमला एका ओव्हरमध्ये चक्क 39 रन्स करण्याची संधी दिली. यामुळे अलाउद्दीनच्या नावावर एका नव्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झालीय.
बांग्लादेशच्या अंडर-19 टीममधून खेळलेल्या अलाउद्दीननं हा कारनामा ढाका प्रिमिअर डिव्हीजन दरम्यान करून दाखवलाय. अबहानी लिमिटेडसाठी खेळताना अलाउद्दीनं शेख जमाल धानमंडी टीमविरुद्ध हा कारनामा केलाय.
झिम्बॉब्वेच्या माजी कॅप्टन एल्टन चिगुंबराच्या विरुद्ध 40 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला नो बॉल करतानाच अलाउदादीनं 5 रन्स दिले. यानंतर त्यानं एक वाइड बॉल टाकला... आणि या ओव्हरमध्ये पहिल्याच दोन नो बॉलमुळे त्याच्याविरुद्ध 6 रन्स काढले गेले होते. त्यानंतर टाकलेल्या पहिल्या बॉलवर चिगुंबरानं षटकार मारला, त्यानंतर फोर, पुन्हा षटकार, पुन्हा चौकार आणि पुन्हा एक षटकार...
या तऱ्हेनं पहिल्या पाच बॉलमध्ये 32 रन्स झाले होते. त्यानंतर अलाउद्दीन पुन्हा एकदा दिशा भरकटला आणि विरद्ध टिमला एक रन दिला. त्यामुळे पुन्हा बॉल टाकवा लागला आणि शेवटचा बॉलवर पुन्हा एक षटकार... आणि बनला क्रिकेटमधला आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड...
लिस्ट-ए मॅचमधला हा एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. या लिस्टमध्ये टी-20 मॅच सोडून सर्व सीमित ओव्हरच्या मॅचेसचा समावेश आहे.
अलाउद्दीनची ही ओव्हर मॅचसाठी निर्णायक ठरली. या ओव्हरच्या मदतीनं शेख जमाल धानमंडीनं नऊ विकेटमध्ये 282 रन्स केले आणि 28 रन्सनं विजय प्राप्त केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.