बांग्लादेश

वैतागलेल्या 'कॅप्टन कूल'नं खेळाडूला काढलं मैदानाबाहेर!

भारत-बांग्लादेश दरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या वन डे सामन्यात बांग्लादेशनं भारताल ७९ रन्सनं धोबीपछाड दिली. पण, याच मॅचमध्ये प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारा एक प्रसंग घडला.

Jun 19, 2015, 10:06 PM IST

स्कोअरकार्ड : बांग्लादेशन ७९ रन्सनं केला भारताचा पराभव

भारत आणि बांग्लादेशमध्ये आजपासून  वन-डे मालिका सुरु झाली आहे. बांग्लादेशने याआधी पाकिस्तानला धूळ चारली होती. त्यामुळे भारतासाठी कडवी लढत असणार आहे.

Jun 18, 2015, 02:21 PM IST

भारत-बांग्लादेश पहिली वन-डे मिरपूर स्टेडियमवर रंगणार

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिली वन-डे मिरपूरच्या स्टेडियमवर रंगणार आहे. दुपारी १.३० वाजता वन-डेला सुरुवात होणार आहे. महेंद्रसिंग धोनी आणि मशरफे मोर्तझा परतल्यानं दोन्ही टीम्स फुल स्ट्रेंथनं मैदानात उतरतील. 

Jun 18, 2015, 09:36 AM IST

भारत-बांग्लादेश एकमेव कसोटी अनिर्णित!

भारत आणि बांग्लादेश दरम्यानचा एकमेव कसोटी सामना अनिर्णित राहिलाय. पावसामुळे हा सामना अनिर्णित राहिला असून त्यामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघ चौथ्या स्थानावर गेला आहे. या कसोटीत आर. अश्विननं पाच तर हरभजन सिंगनं तीन विकेट घेत बांग्लादेश संघाचा धुव्वा उडवलाय. हरभजन सिंगनं तब्बल दोन वर्षांनी पुनरागमन केलय.

Jun 14, 2015, 06:02 PM IST

Live स्कोअरकार्ड : भारत - बांग्लादेश पहिली कसोटी

भारत आणि बांग्लादेशमध्ये पहिली कसोटी सुरु आहे.

Jun 10, 2015, 10:13 AM IST

भारत vs बांग्लादेश पहिली कसोटी, टॉस जिंकून भारताचा बॅटिंगचा निर्णय

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियानं टॉस जिंकून पहिल्यांगा बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आक्रमक विराट कोलहीच्या कॅप्टन्सीची टेस्ट असणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या उपस्थित कोहलीला टीमच्या नेतृत्वाची धुरा सांभाळावी लागणार आहे.

Jun 10, 2015, 09:37 AM IST

पंतप्रधानांच्या बांग्लादेश दौऱ्याचा अखेरचा दिवस, ढाकेश्वरी मंदिरात पूजा

बांग्लादेश दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढाकेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी मोदींनी ढाकेश्वरी देवीची पूजाअर्चा केली. राजा बल्लाल सेन यानं हे ढाकेश्वरी मंदिर बनवलं असून ते ८०० वर्ष जुनं आहे. मंदिर प्रशासनाकडून यावेळी मोदींचा सन्मान करण्यात आला.

Jun 7, 2015, 11:16 AM IST

टीम इंडियाच्या अंतरिम कोच, प्रशिक्षकपदी प्रथमच भारतीय

माजी खेळाडू रवी शास्त्री यांची बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. तर संजय बांगर बॅटिंग कोच आणि बी. अरुण हे बॉलिंग कोच असणार आहेत.

Jun 2, 2015, 01:02 PM IST

युवराज सिंगच्या नावाची निवड समितीत चर्चा नाही : संदीप पाटील

बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. मात्र, या टीममध्ये युवराज सिंग याला स्थान देण्यात आलेले नाही. परंतु ऑफ स्पिनर हरभज सिंग याने कमबॅक केले. टीमची घोषणा करताना युवीच्या नावाची चर्चाही झालेली नाही, अशी स्पष्ट कबुली निवड समितीचे मुख्य संदीप पाटील यांनी दिली.

May 20, 2015, 07:58 PM IST

बांग्लादेश दौरा : भारतीय टीममध्ये नविन चेहऱ्यांना संधी

टीम इंडियाचा पुढील महिन्यात बांग्लादेश दौरा असणार आहे. ७ जूनला भारतीय टीम बांग्लादेशला रवाना होणार आहे. मात्र, या दौऱ्यात नविन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

May 6, 2015, 01:07 PM IST