मोदींच्या ‘हुंकारा’साठी राष्ट्रपतींनी आवरला आपला दौरा!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींसाठी राष्ट्रपतींनी आपला पाटणा दौरा आवरता घेतलाय. राष्ट्रपतींनी आपला पाटण्याचा दौरा एका दिवसानं कमी करून राजधानीत एकदिवस आधी परतण्याचं मान्य केलंय.
Oct 10, 2013, 03:27 PM ISTराष्ट्रपतींचं आणखी पाच जणांच्या फाशीवर शिक्कामोर्तब
अजमल कसाब आणि अफजल गुरूच्या फाशीनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आणखी सात द्या अर्ज निकालात काढलेत.
Apr 4, 2013, 12:46 PM ISTहेलिकॉप्टर घोटाळा : न्यायालयाचा कागदपत्रं देण्यास नकार
१२ऑगस्टा हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातली कागदपत्रं भारताला देण्यास इटलीतल्या न्यायालयानं नकार दिलाय.
Feb 17, 2013, 11:50 AM ISTहॅलिकॉप्टर घोटाळा : अंतिम शिक्का प्रणव मुखर्जींचा
‘ऑगस्टावेटलँड’ हेलीकॉप्टरच्या व्यवहार प्रकरणात यूपीए सरकारच्या ‘फॅक्ट’शीट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचंही नाव पुढे आलंय.
Feb 15, 2013, 03:50 PM ISTकेंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा बदल?
केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाचे संकेत पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी य़ांनी दिले आहेत. पंतप्रधानांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली असून फेरबदलाबाबतची चर्चा झाल्याचं समजतंय.
Oct 16, 2012, 06:59 PM IST‘वादग्रस्त वास्तूचं उद्घाटन राष्ट्रपती करतातच कसे?’
मराठी भाषकांचा विधानभवनाला विरोध आहे. या विरोधाला न जुमानता कर्नाटक सरकारनं कोट्यवधी रुपये खर्चून विधानभवन बांधलंय.
Oct 11, 2012, 01:34 PM ISTशिवसेना आणि भुजबळांचं एकमत
बेळगाव विधानसभेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी जाऊ नये, यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचं एकमत झालं आहे. बेळगाव विधानसभेच्या उद्घाटनाला जाऊ नये असं पत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठवलंय.
Oct 8, 2012, 05:27 PM ISTकसाबसंदर्भात शिवसेनेचं राष्ट्रपतींना पत्र
भारताच्या सुप्रीम कोर्टानेही अजमल कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यामुळे कसाबला फाशी होणार आहे. मात्र त्यासाठी सर्वांत आवश्यक गोष्ट म्हणजे राष्ट्रपतींची परवानगी. यासाठीच शिवसेनेने राष्ट्रपतींना पत्र पाठवलं आहे.
Sep 6, 2012, 10:04 AM ISTभ्रष्टाचाराने देश पोखरलाय - राष्ट्रपती मुखर्जी
www.24taas.com, नवी दिल्ली
देशाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. ती काढून टाकली पाहिजे. यासाठी तरूणांनी पुढाकार घेतला पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा, असे नवनिर्वाचित राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ६६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला दिलेल्या अभिभाषणात सांगितले.
भ्रष्टाचाराने देशाला पोखरले आहे. त्यामुळे देशाची मोठी हानी होत आहे. भ्रष्टाचारासह दहशतवाद, गरीबी आणि जनतेच्या आरोग्य विषयक समस्येला प्राधान्य देऊन त्या आधी सोडविल्या पाहिजेत, असे राष्ट्रपती म्हणालेत.
भ्रष्टाचार देशाच्या प्रगतीला मारक ठरत आहे. त्यातच भ्रष्टाचाराविरोधात जनतेच्या भडकलेल्या भावनांचा मी आदर करतो, मात्र त्यावर प्रभावीपणे अंकुश ठेवला जात नसल्याचे मुखर्जींनी मान्य केले.
देशातील शासकीय संस्था भारतीय संविधानाचे मजबूत स्तंभ आहे. त्या उद्वस्त करता येणार नाही. परंतु, त्यात सुधारणा करता येऊ शकतात, असेही मुखर्जींनी म्हटले. त्यामुळे अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांना अप्रत्यक्ष राष्ट्रपतींनी टोला लगावला.
जनतेने न्यायप्रक्रीयेवर विश्वास ठेवला पाहिजे. जनतेला राज व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु कायदा तयार करण्याचा अधिकार संविधानाला आहे. आणि त्याला न्याय देण्याचा अधिकार न्याय प्रक्रियेला आहे. आपण हा अधिकार न्याय संस्थांकडून हिरावून घेऊ शकत नाही, असेही अण्णा आणि बाबांना सुनावताना सांगितले की, जर अधिकारी हुकूमशाहा बनले तर मात्र लोकशाहीचे मोठे नुकसान होत असते. शालिनता आणि सहिष्णुता लोकशाहीचा मूळ आधार आहे.
Aug 14, 2012, 10:18 PM ISTप्रणवदा राष्ट्रपतीपदावर विराजमान
भारताचे नवे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ ग्रहण केलीय. प्रणव मुखर्जी यांनी भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलीय. भारताचे सरन्यायाधीश एच. एस. कपाडिया यांच्याकडून त्यांनी शपथ घेतली.
Jul 25, 2012, 03:21 PM ISTप्रणवदा आज घेणार शपथ
प्रणव मुखर्जी आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. भारताचे सरन्यायाधिश एच. एस. कपाडिया प्रणव मुखर्जी यांना शपथ देतील.
Jul 25, 2012, 08:28 AM ISTराष्ट्रपती अफजल गुरुला फाशी द्या - ठाकरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा नवनिर्वाचित राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं अभिनंदन केलंय.अभिनंदन करताना दहशतवादी अफजल गुरुचा अर्ज फेटाळून त्याला फासावर लटकावा आणि इतिहास घडवा, अशी मागणी बाळासाहेबांनी मुखर्जी यांच्याकडे केली.
Jul 23, 2012, 12:02 PM ISTगोंडवाना विद्यापीठ म्हणतं 'प्रणवदाच राष्ट्रपती'
चंद्रपूर-गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाचा अनोखा प्रताप पुढं आलाय. विद्यापीठाच्या एफवायबीएच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात १४वे राष्ट्रपती म्हणून चक्क प्रणव मुखर्जींच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय.
Jul 19, 2012, 06:22 PM ISTराष्ट्रपती निडवणुकीचे आज मतदान
राष्टपतीपदासाठी आज निवडणूक होतेय. प्रणव मुखर्जी आणि पी. ए. संगमा यांच्यामध्ये राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक आहे. यामध्ये प्रणवदांचं पारडं जड दिसतंय.
Jul 19, 2012, 12:03 PM ISTममतांचा यू-टर्न, प्रणवदांना पाठिंबा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी यू टर्न घेत प्रणव मुखर्जी यांना आपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतीपदाचे यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
Jul 17, 2012, 06:05 PM IST