हेलिकॉप्टर घोटाळा : न्यायालयाचा कागदपत्रं देण्यास नकार

१२ऑगस्टा हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातली कागदपत्रं भारताला देण्यास इटलीतल्या न्यायालयानं नकार दिलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 17, 2013, 11:50 AM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
१२ऑगस्टा हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातली कागदपत्रं भारताला देण्यास इटलीतल्या न्यायालयानं नकार दिलाय.
हेलिकॉप्टरमधील व्यवहारात झालेल्या लाचखोरीचे पुरावे आणण्यासाठी रविवारी संरक्षण मंत्रालय आणि सीबीआयची टीम इटलीला जाणार आहे. तसंच संरक्षण मंत्रालयाचे सचीव ए.के. बल हेदेखील इटलीला रवाना होणार आहेत.
या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयनं संरक्षण मंत्रालयाच्या अधिका-यांशी चर्चा करून या खरेदीप्रक्रियेची माहिती घेतली आहे. मात्र सीबीआयकडे अद्याप कोणतीही ठोस कागदपत्रं नाहीत. तसंच या तपासात मदत करण्याची मागणी इंटरपोल या आंतरराष्ट्रीय तपास संघटनेनं अद्याप मान्य केलेली नाही.

या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यावरच मदत केली जाऊ शकेल, असं इंटरपोलनं कळवलंय. दुसरीकडे या प्रकरणी सरकारवर दबाव वाढत असून तपासत चालढकल होत असल्याचा भाजपचा आरोप आहे.