राष्ट्रपती निडवणुकीचे आज मतदान

राष्टपतीपदासाठी आज निवडणूक होतेय. प्रणव मुखर्जी आणि पी. ए. संगमा यांच्यामध्ये राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक आहे. यामध्ये प्रणवदांचं पारडं जड दिसतंय.

Updated: Jul 19, 2012, 12:03 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

राष्टपतीपदासाठी आज निवडणूक होतेय. प्रणव मुखर्जी आणि पी. ए. संगमा यांच्यामध्ये राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक आहे. यामध्ये प्रणवदांचं पारडं जड दिसतंय.

 

आज होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं कंबर कसली असून महाराष्टातून जास्तीत जास्त मतं प्रणव मुखर्जींना मिळावीत असा प्रदेश काँग्रेसचा आणि मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. यासाठी मनसेची १२ मतं मिळवण्याचाही प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी सुरू केलाय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तर संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील हे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांच्या संपर्कात आहेत. राष्टपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेसह इतर सर्व लहान पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने या निवडणुकीत राज्यातून प्रणव मुखर्जी यांना २८८ पैकी तब्बल २२८ मतं मिळतील, असा काँग्रेसचा दावा आहे. तर विरोधी उपमेदवार पी. ए. संगमा यांच्या बाजूने भाजपाची ४७ आणि एक अपक्ष अशी केवळ ४८ मतं असल्याचं बोललं जातंय.