पेट्रोल

पेट्रोल आणि डिझेल दरात आज रात्रीपासून कपात

पेट्रोल आण डिझेलच्या किंमती पुन्हा कपात करण्यात आली आहे. पेट्रोल २.४२  रुपये, तर डिझेल२.२५ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Feb 3, 2015, 06:15 PM IST

'पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त आहे' - दिग्विजय

काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी सरकारवर डिझेल आणि पेट्रोलच्या बदल्यात जास्त पैसे आकारल्याचा आरोप केला आहे. दिग्विजय सिंह यांनी केलेल्या आरोपांनुसार, ग्राहकांकडून डिझेलमागे २७ तर पेट्रोलमागे २८ रूपये जास्त आकारले जात आहेत.

Jan 28, 2015, 10:18 AM IST

सरकारकडून पेट्रोलवर २८ आणि डिझेलवर २७ रुपये जादा वसूली

 २००९ च्या तुलनेत सरकार डिझेलवर २७ रुपये तर पेट्रोलवर २८ रुपये अधिक वसूल करीत असल्याचा आरोप काँग्रेसच महासचिव दिग्विजय सिंग यांनी केला आहे. 

Jan 27, 2015, 08:07 PM IST

पेट्रोलच्या किंमतीपेक्षा 'कर' महाग

आतंरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे भाव कमी होत असले, तरी पेट्रोलचे दर हवे तेवढे कमी होण्यास तयार नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत सतत घसरण सुरू आहे. केंद्र सरकारने त्यानंतर वित्तीय तूट कमी करण्यासाठी उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. 

Jan 21, 2015, 11:54 PM IST

पेट्रोल, डिझेलपाठोपाठ युरियाही नियंत्रणमुक्त होणार

देशात पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ युरियाचेही दर नियंत्रणमुक्त होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार युरियाचे दर नियंत्रणमुक्त करण्याबाबत विचारधीन असून लवकरच याचा निर्णय होणार आहे. येत्या तीन वर्षांत टप्प्याटप्प्यानं युरिया नियंत्रणमुक्त होण्याचे संकेत आहेत. 

Jan 19, 2015, 03:37 PM IST

पेट्रोल २.४२ रुपये तर डिझेल २.२५ रुपयांनी स्वस्त

पेट्रोल आणि डिझेल अपेक्षेप्रमाणे पुन्हा स्वस्त झाले आहे. पेट्रोल २ रूपये ४२ पैशांनी तर डिझेल २ रुपये २५ पैशांनी स्वस्त झाले आहेत.

Jan 16, 2015, 08:21 PM IST

उद्यापासून पुन्हा एकदा स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा कमी होण्याच्या मार्गावर आहेत. 

Jan 14, 2015, 01:12 PM IST

पेट्रोल-डिझेल भरताना पकडली जाईल चोरीची गाडी

चोरीच्या गाडीत पेट्रोल-डिझेल भरताना चोर पकडला जाईल. ऐकायला जरा विचित्र वाटत असेल, पण हे शक्य आहे. भारत पेट्रोलियम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अशा प्रकारची व्यवस्था सुरू केली आहे. त्या अंतर्गत चोराने भारत पेट्रोलियमच्या पंपावर पेट्रोल-डिझेल भरल्यावर मालकाला एसएमएस जाणार आहे. यात इंधनाचे प्रमाण आणि लोकेशनचा उल्लेख असणार आहे. 

Jan 5, 2015, 06:59 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांनी वाढ

पेट्रोल-डिझेलवर उत्पादन शुल्क दोन रुपयांनी वाढवण्यात आलंय. पण, या वाढलेल्या उत्पादन शुल्काचा बोझा जनतेवर पडणार नाही. 

Jan 1, 2015, 07:53 PM IST

पेट्रोल-डिझेलचे दर आज रात्रीपासून पुन्हा उतरणार?

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर घटल्यानं तेल कंपन्यांना झालेला फायदा त्यांनी जनतेलाही द्यावा, असं सरकारचं म्हणणं आहे. 

Dec 31, 2014, 04:02 PM IST

पेट्रोल-डिझेल २ रुपयांनी स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून पेट्रोलच्या दरात झालेली ही आठवी दर कपात आहे तर डिझेलच्या दरात चौथी कपात आहे. 

Dec 15, 2014, 07:57 PM IST

पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी कमी?

सर्वांसाठी आणखी एक आनंदाची बातमी येऊ शकते कारण पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी खाली येण्याची शक्यता वाढली आहे. 

Dec 11, 2014, 04:46 PM IST

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहेत,  पेट्रोल आणि डिझेलवरील एक्झाइज ड्युटी अर्थात उत्पादन शुल्कात वाढ केली आहे.

Dec 2, 2014, 05:21 PM IST