नागौर : चोरीच्या गाडीत पेट्रोल-डिझेल भरताना चोर पकडला जाईल. ऐकायला जरा विचित्र वाटत असेल, पण हे शक्य आहे. भारत पेट्रोलियम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अशा प्रकारची व्यवस्था सुरू केली आहे. त्या अंतर्गत चोराने भारत पेट्रोलियमच्या पंपावर पेट्रोल-डिझेल भरल्यावर मालकाला एसएमएस जाणार आहे. यात इंधनाचे प्रमाण आणि लोकेशनचा उल्लेख असणार आहे.
यासाठी ग्राहकाला इंधन भरल्यानंतर इलेक्ट्रॉनिक बील घ्यावे लागले. एसएमएसने गाडीच्या मालकाला पोलिस ठाण्यात गाडीची लोकेशन देता येऊ शकते.
वाहन मालक घरी बसून ठेवू शकतात नजर
ज्या गाडी मालकांची टॅक्सी, ट्रक आणि इतर जड वाहने ड्रायव्हर चालवतात, त्यांनाही एसएमएस सुविधामुळे फायदा होणार आहे. काही ड्रायव्हर आणि कंडक्टर गाडीमध्ये इंधन कमी भरतात आणि बिल अधिक घेऊन मालकांना फसवतात. पण या सुविधेमुळे ड्रायव्हर जसे इंधन भरेल तसा रजिस्टर मोबाइल नंबरवर एसएमएस पोहचेल.
अस करू शकतात रजिस्ट्रेशन
भारत पेट्रोलियमने नागौर जिल्ह्यातील सेल्स अधिकारी हरप्रीत सिंह यांनी सांगितले की, कंपनीची रजिस्ट्रेशन सुविधा मोफत आहे. यासाठी ग्राहकांना वाहन क्रमांक आणि त्यांचा मोबाईल क्रमांक रजिस्टर करावा लागेल. पंपावर रजिस्टर झाल्यावर या डिटेल्स कंपनीला पाठवल्या जातील.
यानंतर देशभरात कुठेही भारत पेट्रोलियमच्या पंपावर इंधन भरल्यास मालकाला तो एसएमएस जाईल. किती पेट्रोल भरले तरी हा एसएमएस जाणार आहे. नागौर शहरात ही सुविधा चौधरी पेट्रोल पंपावर सुरू केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.