'पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त आहे' - दिग्विजय

काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी सरकारवर डिझेल आणि पेट्रोलच्या बदल्यात जास्त पैसे आकारल्याचा आरोप केला आहे. दिग्विजय सिंह यांनी केलेल्या आरोपांनुसार, ग्राहकांकडून डिझेलमागे २७ तर पेट्रोलमागे २८ रूपये जास्त आकारले जात आहेत.

Updated: Jan 28, 2015, 10:18 AM IST
'पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त आहे' - दिग्विजय title=

भोपाळ : काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी सरकारवर डिझेल आणि पेट्रोलच्या बदल्यात जास्त पैसे आकारल्याचा आरोप केला आहे. दिग्विजय सिंह यांनी केलेल्या आरोपांनुसार, ग्राहकांकडून डिझेलमागे २७ तर पेट्रोलमागे २८ रूपये जास्त आकारले जात आहेत.

दिग्विजय सिंह भोपाळ महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार करीत आहेत, त्यावेळी त्यांनी हे आरोप केले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात २००९  मध्ये पेट्रोलची किंमत ५१ डॉलर प्रती बॅरल होती. त्या वेळी पेट्रोल ३७ रूपये लीटर तर डिझेल ३० रूपये लीटर होतं, असं दिग्विजय सिंह म्हणतात, तसेच आता आंतरराष्ट्रीय बाजारात एका बॅरलची किंमत ४६ डॉलर प्रति बॅरलला पोहोचली आहे. तरीही देशात पेट्रोल ६३ रूपये आणि डिझेल ५७ रूपये विकलं जात आहे. 

दिग्विजय सिंह यांनी आरोप केला आहे की सरकार अजूनही जास्त किमतीत डिझेल आणि पेट्रोल विकतंय. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांची किंमत कमी होत आहे, तरीही याचा लाभ सर्वसामान्य जनतेला होत नसल्याचं दिग्विजय सिंह यांनी म्हटलंय.

देशाची अर्थव्यवस्था खराब करण्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी लावला आहे. देशाची अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे हे आकड्यांवरून नाही तर खेड्यातील किराणा दुकानं, सोने आणि कापड व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यावरून समजतं, असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.