पेट्रोल २.४२ रुपये तर डिझेल २.२५ रुपयांनी स्वस्त

पेट्रोल आणि डिझेल अपेक्षेप्रमाणे पुन्हा स्वस्त झाले आहे. पेट्रोल २ रूपये ४२ पैशांनी तर डिझेल २ रुपये २५ पैशांनी स्वस्त झाले आहेत.

Updated: Jan 16, 2015, 08:21 PM IST
पेट्रोल २.४२ रुपये तर डिझेल २.२५ रुपयांनी स्वस्त title=

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल अपेक्षेप्रमाणे पुन्हा स्वस्त झाले आहे. पेट्रोल २ रूपये ४२ पैशांनी तर डिझेल २ रुपये २५ पैशांनी स्वस्त झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आलीय.मुंबईत आता पेट्रोलसाठी प्रति लिटर ६६ रूपये ४४ पैसे मोजावे लागणार आहेत. आज मध्यरात्रीपासूनच हे कमी झालेले नवीन दर लागू होणार आहेत.

ही दर कपात शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने भारतामध्ये पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये कपात करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पहिल्यांदाच इतक्या खाली घसरल्या असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये घसरण होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.