भोपाळ : २००९ च्या तुलनेत सरकार डिझेलवर २७ रुपये तर पेट्रोलवर २८ रुपये अधिक वसूल करीत असल्याचा आरोप काँग्रेसच महासचिव दिग्विजय सिंग यांनी केला आहे.
भोपाळमध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिग्विजय सिंग बोलत होते. ते म्हणाले, २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या किंमती प्रति बॅरल ५१ डॉलर इतकी होती. त्यावेळी पेट्रोल ३७ आणि डिझेल ३० रुपये प्रति लीटर होते.
सिंह यांनी सांगितले की, आज आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थाचे दर ४६ डॉलर प्रति बॅरल पर्यंत खाली आली आहे. परंतु, देशात पेट्रोलचा दर ६३ रूपये प्रति लीटर आणि डिझेल ५७ रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. त्यामुळे सरकार आज पेट्रोलवर २८ रुपये तर डिझेलवर २७ रूपये प्रति लीटर अधिक वसूल करीत आहेत.
२०१४ मध्ये एनडीए सरकारने चार वेळा उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती कमी झाल्या तरी सामान्यांना त्याचा फायदा झालेला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.