Oberoi Family Dispute : ओबेरॉय कुटुंबात विद्रोह; अरब साम्राज्यावरून 2 बहिणींमध्ये संघर्ष, 90 वर्षांच्या वारशावर असलेल्या हॉटेल्सवर कोणाचा अधिकार?

Oberoi family feud : भारतात हॉटेल जगतात क्रांती घडवणाऱ्या ओबेरॉय कुटुंबात संपत्तीवरून वाद पेटलाय. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील दिग्गज पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांचं नोव्हेंबर 2023 मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या दोन इच्छापत्रांमुळे सावत्र भावडांमध्ये संघर्ष सुरु झालाय. 

नेहा चौधरी | Updated: Sep 21, 2024, 09:31 AM IST
Oberoi Family Dispute : ओबेरॉय कुटुंबात विद्रोह; अरब साम्राज्यावरून 2 बहिणींमध्ये संघर्ष, 90 वर्षांच्या वारशावर असलेल्या हॉटेल्सवर कोणाचा अधिकार?  title=
oberoi family dispute brothers 2 sisters are locked in bitter battle over a billion dollar hotel empire in delhi high court

Anastasia vs Natasha Oberoi : जगातील सर्वात आलिशान हॉटेल्सपैकी एक असलेल्या ओबेरॉय हॉटेलबाबत सुरू असलेला कौटुंबिक वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये ओबेरॉय हॉटेलचे मालक पृथ्वी राज सिंग यांच्या निधनानंतर, त्यांच्या वारशासाठी सुरू असलेल्या लढ्याचे आता कायदेशीर लढ्यात रूपांतर झाल असून कोट्यवधी डॉलर्सच्या साम्राज्यावरून दोन बहिणींमध्ये वाद विकोपाला गेलाय. या वारसा हक्कावरील वादाचं केंद्र पीआरएस ओबेरॉय यांची त्यांच्या दुसऱ्या लग्नातील मुलगी अनास्तासिया ओबेरॉय आहे. ओबेरॉय समूहाची प्रमुख कंपनी EIH लिमिटेड मधील महत्त्वपूर्ण समभागांसह मालमत्तेच्या विभाजनाला तिचा विरोध आहे. सावत्र भाऊ विक्रमजीत ओबेरॉय, सावत्र बहीण नताशा ओबेरॉय आणि चुलत भाऊ अर्जुन ओबेरॉय आणि अनास्तासिया ओबेरॉय यांच्यात वारसा हक्काची लढाई पाहिला मिळतंय. 

काय आहे नेमकं प्रकरण ?

खरं तर ही सगळी लढाई  पृथ्वी राज सिंग ओबेरॉय यांच्या दोन इच्छापत्रांमुळे सुरु झाली आहे. झालं असं की, एक मृत्यूपत्र 1992 सालचं आणि दुसरं 2021 सालचं आहे. 27 ऑगस्ट 2022 च्या कोडीसिलमुळे हा वाद अधिकच गुंतागुंतीचा झालाय. खरं तर, अनास्तासिया ओबेरॉय म्हणते की इच्छापत्रानुसार, तिला तिच्या दिवंगत वडिलांनी EIH आणि ओबेरॉय हॉटेल्समध्ये ठेवलेले अर्धे शेअर्स मिळायला हवेत आणि काही भाग AO ट्रस्टकडे जायला हवा, ज्यापैकी ती एकमेव लाभार्थी आहे.

दरम्यान आता दिल्ली उच्च न्यायालयाने ईआयएच, ओबेरॉय हॉटेल्स आणि ओबेरॉय प्रॉपर्टीजमधील दिवंगत पीआरएस ओबेरॉय यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या हस्तांतरण किंवा हस्तांतरणावर तात्पुरती बंदी घातली आहे.

अनास्तासिया ओबेरॉयने तिची सावत्र भावंडं विक्रमजीत, नताशा आणि चुलत भाऊ अर्जुन यांना कोर्टात खेचलंय. अनास्तासियाने या लोकांवर तिचे दिवंगत वडील पीआरएस यांच्या इच्छेची अंमलबजावणी थांबवल्याचा आरोप केलाय.
तर दुसऱ्या पक्षाने मृत्युपत्राच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करून 20 मार्च 1992 रोजी केलेले मृत्युपत्र सादर केलंय. या पक्षाचे म्हणणे आहे की, विभाजन 32 वर्षांपूर्वी केलेल्या इच्छापत्रावर आधारित असावं, कारण ते ग्रुपचे संस्थापक मोहन सिंग ओबेरॉय यांच्यासमोर करण्यात आलं होतं.

ओबेरॉय फॅमिली ट्री

ओबेरॉय ग्रुपची स्थापना मोहन सिंग ओबेरॉय यांनी केली होती. त्याला दोन मुलं होतं. एक टिळक राजसिंग ओबेरॉय आणि छोटे पृथ्वीराज सिंग ओबेरॉय उर्फ पीआरएस. या दुसऱ्या पिढीच्या काळातच या समुहाची मोठ्या प्रमाणावर प्रगती पाहिला मिळाली. 

व्यवसाय

लक्झरी हॉटेल्सचा व्यवसाय करणाऱ्या ओबेरॉय ग्रुपची स्थापना 1934 मध्ये मोहन सिंग ओबेरॉय यांनी केली होती. मोहनसिंग ओबेरॉय नशीब आजमावण्यासाठी अविभाजित पंजाबमधून शिमला इथे आलेत. कंपनीच्या वेबसाइटनुसार, त्यांना सेसिल हॉटेलमध्ये फ्रंट डेस्क क्लार्क म्हणून 50 रुपये/महिना पगारावर नोकरी त्या काळात मिळाली होती. नंतर काही काळानंतर मोहन सिंग यांनी विकत घेतलेल्या क्लार्क्स हॉटेलमध्ये त्यांनी कामही केलं होतं. यासाठी मोहन सिंग यांनी पत्नी आणि जवळपास संपूर्ण कुटुंबाची संपत्ती गहाण ठेवली होती. 

इथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला, जो पुढच्या काही दशकांमध्ये लक्झरी भारतीय हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील बदल घडवून आणला. द क्लार्क्सनंतर मोहन सिंग यांनी दिल्लीतील द मेडन्ससोबत व्यवसाय सुरू केला. आज समूहाचे मुख्यालय नवी दिल्ली इथे दिमाखात उभे आहे.

आज समूह एकूण 32 लक्झरी हॉटेल्स आणि 2 रिव्हर क्रूझ आहेत.

7 देशांमध्ये इंडोनेशिया, UAE, इजिप्त, मॉरिशस, मोरोक्को, सौदी अरेबिया इथे त्यांचा व्यवसायचा विस्तार झालाय. 

समूह ट्रायडेंट हॉटेल ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 10 हॉटेल्स चालवतात.

हे फ्लाइट केटरिंग, विमानतळ रेस्टॉरंट, टूर आणि प्रवास सेवा, प्रकल्प व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट एअर चार्टर्सचा व्यवसाय करतात.

शिवाय EIH आणि EIH असोसिएटेड हॉटेल्स या दोन होल्डिंग कपन्या आहेत.

EIH चे कार्यकारी अध्यक्ष अर्जुनसिंग ओबेरॉय असून त्याचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक विक्रमजीत सिंग ओबेरॉय आहेत. EIH असोसिएटेड हॉटेल्सचे नेतृत्वही विक्रमजीत सिंग ओबेरॉय यांच्या हातात आहे.

EIH शेअरहोल्डिंग पॅटर्न:

EIH ही एक सूचीबद्ध कंपनी असून ज्यामध्ये प्रवर्तकांचा हिस्सा 32.85% आहे.
ITC ची कंपनीत 13.69% भागीदारी आहे.
तर रिलायन्सचा 18.83% हिस्सा आहे.
EIH चे मार्केट कॅप सुमारे 23.93 हजार कोटी रुपये आहे. जून 2024 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 85.35 कोटी रुपये होता. ही घट 5.21% (YoY) होती.

कंपनीच्या बोर्डात मनोज मोदी (संचालक), नीता मुकेश अंबानी (संचालक) यांच्यासह इतरांचा समावेश यात आहे. 

कोण आहे अनास्तासिया ओबेरॉय?

पीआरएस ओबेरॉयच्या दुसऱ्या लग्नातून जन्मलेली अनास्तासिया ओबेरॉय या कायदेशीर वादात आघाडीवर आहे. वारसा लढ्यात तिच्या भूमिकेच्या पलीकडे, ती हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा यासारख्या उद्योगांमधील पाच कंपन्यांमध्ये संचालक म्हणून काम करते. ओबेरॉय हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड, ओबेरॉय होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड, ओबेरॉय प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, ओबेरॉय बिल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ओबेरॉय इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड हे त्यांचे संचालकत्व कौटुंबिक व्यवसाय साम्राज्यात त्यांचा खोल सहभाग पाहिला मिळतो.

अनास्तासियाची सावत्र बहीण नताशा ओबेरॉय कुटुंबाच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील महत्त्वाची खेळाडू आहे. वाईन उद्योगातही त्यांनी नाव कमावले असून 2002 मध्ये तिने चिंकारा वाईन्सची स्थापना केली. जी भारत, इंडोनेशिया आणि मलेशियासह दक्षिण पूर्व आशियाई बाजारपेठांमध्ये निर्यात करण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये पिकवलेल्या द्राक्षांपासून उत्तम वाइन तयार करते. ओबेरॉय हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड, ओबेरॉय प्रॉपर्टीज प्रा. त्यामुळे तिचा कौटुंबिक वारसा मजबूत होतो.

दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय 

अनास्तासियाचा मुख्य दावा ओबेरॉय ग्रुपच्या मालमत्तेवर आहे. ज्यामध्ये कपाशेरा, दिल्लीमधील कौटुंबिक घराचाही समावेश आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्या बाजूने अंतरिम आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये प्रकरण निकाली निघेपर्यंत ओबेरॉय समूहाशी संबंधित कोणत्याही समभाग किंवा मालमत्तांच्या हस्तांतरणावर बंदी घालण्यात आलीय.