नवी दिल्ली : सर्वांसाठी आणखी एक आनंदाची बातमी येऊ शकते कारण पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी खाली येण्याची शक्यता वाढली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता वाढली आहे.
युरोप व जपानची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत आहे. दुसरीकडे चीनच्या प्रगतीचा वेग खालावत चालल्याचे संकेत आहेत. जागतिक बाजारपेठेत मागणी कमी असल्यामुळे कच्च्या तेलाचे दर ६० डॉलर पेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे.
प्रति बॅरलचे दर ६० डॉलरपेक्षा खाली आल्यास अमेरिकेच्या विकासावर याचा परिणाम होईल. भारताला याचा फायदा होऊन पेट्रोल व डिझेलचे दर कमी होतील.
परंतु, जागतिक मागणी कमी झाल्यास भारतासाठीसुद्धा एक धोका होण्याची शक्यता आहे. भारताच्या निर्यातीवर याचा परिणाम होऊ शकतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.