महाकवी नामदेव ढसाळ यांच्यावर आज अंत्यसंस्कार
साठोत्तरीतील मराठी कवितेतील एक प्रतिभाशाली दलित साहित्यिक आणि महाकवी नामदेव ढसाळ यांचं पार्थिव आज वडाळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज प्रांगणात त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहेत. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Jan 16, 2014, 11:46 AM ISTनामदेव ढसाळ यांचा अल्पपरिचय
दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.
ते आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ढसाळ यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याचा हा अल्पपरिचय.
महाकवी नामदेव ढसाळ यांना <B> <font color=red>द्या श्रद्धांजली! </font></b>
मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार होणार आहेत. आज दिवसभर वडाळ्यातील सिद्धार्थ हॉस्टेल इथं अंत्यदर्शनासाठी ढसाळ यांचं पार्थिव ठेण्यात येणार आहे.
Jan 15, 2014, 10:32 AM ISTमहाकवी दलित पँथर नामदेव ढसाळ यांचे मुंबई निधन
मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई त्यांचे निधन झाले.
Jan 15, 2014, 07:34 AM ISTइस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरॉन यांचं निधन
द किंग ऑफ इस्रायल`, `द लायन ऑफ गॉड` या बिरुदावल्या मिरवणारे इस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरॉन यांचे शनिवारी निधन झालं ते ८५ वर्षांचे होते. २००६ मध्ये पक्षाघाताचा झटका आल्यानंतर आठ वर्षांपासून ते कोमात गेले होते.
Jan 12, 2014, 10:46 AM ISTदाजीकाका गाडगीळ यांचे पुण्यात निधन
पु. ना. गाडगीळ आणि कंपनी या पुण्यातल्या सराफी पेढीचे आधारस्तंभ, शंभरीतही तरुणाईला लाजवणारा उत्साह अंगी असणारे अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांचे शुक्रवारी पुण्यात प्रयाग रुग्णालयात वृद्धापकाळानं निधन झालंय. ते 99 वर्षाचे होते.
Jan 10, 2014, 03:02 PM ISTज्येष्ठ अभिनेते फारूख शेख यांचे दुबईत निधन
दुबई - ज्येष्ठ अभिनेते फारूख शेख यांचं निधन दुबईमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचे वय ६५ वर्षे होते. ते आपल्या कुटुंबीयांसोबत दुबईला गेले होते.
Dec 28, 2013, 08:49 AM ISTअतुल सरपोतदार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
मनसेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांच्या पार्थिवावर खेरवाडीतल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या अनेक दिग्गज कार्यकर्त्यांनी भावपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला.
Dec 27, 2013, 03:55 PM ISTमनसेचा मावळा हरपला; अतुल सरपोतदार यांचं निधन
गुरुवारी, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक मोठा धक्का बसलाय. मनसे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचं सायंकाळी ७.०० वाजल्याच्या सुमारास निधन झालंय.
Dec 26, 2013, 08:35 PM ISTएके -४७ रायफल निर्मात्याचे निधन
जगभरात प्रसिद्ध झालेल्या कॅलेशनिकोव्ह रायफल म्हणेजच एके रायफलचा निर्माता मिखाईल कॅलेशनिकोव्ह यांचं निधन झालं. तत्कालीन युएसएसआरसाठी त्यांनी सर्वप्रथम एके-४७ य़ा रायफलची निर्मिती केली होती. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांनी निर्माण केलेली अव्हटोमॅट कॅलेशनिकोव्ह ४७ म्हणजेच एके -४७ ही असॉल्ट रायफल जगभरात अतिशय प्रसिद्ध झाली.
Dec 24, 2013, 06:09 PM IST`इंडियन आयडॉल-२`चा विजेता संदीप आचार्यचं निधन!
नुकतीच एक धक्कादायक बातमी आलीय... इंडियन आयडॉल स्पर्धेतील २००६ मधील विजेता संदीप आचार्य याचं आज सकाळी नऊच्या सुमारास गुडगाव इथल्या मेदांता हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्याच्या मागे त्याची पत्नी आणि एक महिन्याची मुलगी आहे.
Dec 15, 2013, 06:19 PM ISTनेल्सन मंडेला श्रद्धांजली: दक्षिण आफ्रिकेत १० दिवस शोकसभा
दक्षिण आफ्रिकेतील महात्मा म्हणून समजले जाणारे नेल्सन मंडेला यांच्यावर १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या अंत्यसंस्काराची तयारी ही शनिवारीच सुरु करण्यात आली आहे. तसंच त्यांची शोकसभा १० दिवस चालणार आहे. या शोकसभेत जगभरातून असंख्य लोक आणि नेते मंडळी येण्याची शक्यता आहे. जोहान्सबर्ग या ९५,००० सीटची क्षमता असलेल्या स्टेडियमवर मंगळवारी मंडेला यांची शोकसभा होणार आहे. या शोकसभेत मोठ्या प्रमाणावर जनता एकत्रित येण्याची शक्यता आहे.
Dec 8, 2013, 10:52 AM IST`फास्ट अॅन्ड फ्युरिअस`फेम पॉलचा अपघात, जागीच ठार
जगविख्यात अभिनेता पॉल वॉकर याचं कार अपघातात निधन झालंय. ‘फास्ट अॅन्ड फ्युरियस’ मुव्ही सीरीजच्या हा चेहऱ्यानं साऱ्या जगात ‘सुपरफास्ट’ गाडी चालवत आपली चांगलीच ओळख निर्माण केली होती.
Dec 1, 2013, 11:47 AM IST‘लंबी जुदाई...’च्या गायिका रेश्मा यांचं निधन
जेष्ठ पाकिस्तानी पार्श्वगायिका रेश्मा यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ६६ वर्षांच्या होत्या. रेश्मा या घशाच्या कर्करोगामुळं त्रस्त होत्या. गेल्या महिनाभरापासून त्या कोमात होत्या. लाहोरमध्ये एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. रुग्णालयातच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
Nov 3, 2013, 11:29 AM ISTमन्ना डेंचे अ अ आई...
सुप्रसिद्ध गायक मन्ना डे यांनी चित्रपटसृष्टीत सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत हिंदी, मराठी, बंगाली, आसामी, मल्याळम, कन्नड, गुजराती, पंजाबी, भोजपुरी अशा विविध प्रादेशिक भाषांमधून सुमारे साडेतीन हजारहून अधिक गाणी गायली. मन्ना डे यांची मराठी गाणीही खूप गाजली आहेत.
Oct 24, 2013, 12:04 PM IST