www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
सुप्रसिद्ध गायक मन्ना डे यांनी चित्रपटसृष्टीत सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत हिंदी, मराठी, बंगाली, आसामी, मल्याळम, कन्नड, गुजराती, पंजाबी, भोजपुरी अशा विविध प्रादेशिक भाषांमधून सुमारे साडेतीन हजारहून अधिक गाणी गायली. मन्ना डे यांची मराठी गाणीही खूप गाजली आहेत.
मन्ना डे यांचे प्रदीर्घ आजाराने गुरुवारी सकाळी बंगळुरू येथे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांनी मरीठीत अ..अ आई…म..म..मका, आम्ही जातो आपुल्या गावा, नंबर ५४, धुंद आज डोळे, चला पंढरीला जाऊ आदी ५५ अजरामर चित्रपट गीते आणि अन्य १५ गाणी गायली आहेत.
मन्ना डे यांच्या पश्चात मुली शुरोमा आणि सुमिता आहेत. मन्ना डे यांच्या पत्नीचे गेल्या वर्षी निधन झाले होते. १ मे १९१९ रोजी कोलकात्यात जन्मलेल्या मन्ना डे यांचे मूळ नाव प्रबोधचंद्र डे. त्यांनी संगीताची आवड लागली ती त्यांच्या काकांमुळे. मात्र त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी वकील बनावे, पण मन्ना डे यांनी संगीताचीच निवड केली.
कोलकात्यातील स्कॉटिश कॉलेजमध्ये शिक्षण घेतानाचा त्यांनी के. सी. डे यांच्याकडून शास्त्रीय संगीतातील बारकावेही शिकून घेतले. कॉलेजमध्ये संगीतच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या मन्ना डे यांनी सलग तीन वर्ष ती स्पर्धा जिंकली.
२३ व्या वर्षी मन्ना डे आपल्या काकांसोबत मुंबईत आले आणि त्यांचे सहाय्यक बनले.
उस्ताद अब्दुल रेहमान खान आणि उस्ताद अमन अली खान यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते सचिन देव बर्मन यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करू लागले. त्यांनी अनेक संगीत दिग्दर्शकांकडे सहाय्यक म्हमून काम करावे लागले. प्रतिभावान असूनही त्यांना अनेक वर्ष संघर्ष करावा लागला. `तमन्ना` या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील आपला प्रवास सुरू केला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ