गडकरींनी केला ठाकरेंवर गंभीर आरोप
गेल्या काही दिवसांपासून गैरव्यवहारप्रकरणी आरोपांमुळं बॅकफूटवर गेलेल्या नितीन गडकरींनी शेवटी आज आपले मौनव्रत सोडत विरोधकांना इशारा दिला. नागपुरात झालेल्या जंगी स्वागतानंतर, त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकरावांवर ऊस उत्पादकांची २३ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. माणिकरावांनी मात्र आरोप फेटाळून लावलेत.
Oct 29, 2012, 10:31 PM ISTगडकरींच्या पाठिशी भाजप - जावडेकर
भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी हे आपल्या पदाचा राजीनामा देतील ही बातमी साफ चुकीची आणि निराधार आहे. गडकरी यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. भाजप गडकरींच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिले.
Oct 26, 2012, 11:58 PM IST‘आरएसएसनं वापरला चोरीचा पैसा’
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी आणि आरएसएसवर घणाघाती आरोप केले आहेत. गडकरी सार्वजनिक बांधकाममंत्री असताना नागपुरातल्या आरएएसच्या कार्यालयाचे बांधकाम झाले आहे. त्यामुळं यासाठी आलेला पैसा हा संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
Oct 25, 2012, 09:38 PM ISTनितीन गडकरी अडचणीत
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या `पूर्ती पॉवर अँड शुगर`मधल्या घोटाळ्यांबद्दल केजरीवाल यांनी आवाज उठवल्यामुळे गडकरी चांगलेच अडचणीत आले आहेत.
Oct 24, 2012, 02:26 PM ISTतर अण्णा हजारेंसारखे हाल होतील - बाळासाहेब
भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवरील आरोपांप्रकरणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नितीन गडकरींची पाठराखण केली. सामना या मुखपत्रात त्यांनी ठाकरी शैलीत अरविंद केजरीवाल आणि अंजली दमानिया यांचा समाचार घेतलाय.
Oct 19, 2012, 05:35 PM ISTकेजरीवालांच्या आरोपांवर शिवसेनेची संशयाची फोडणी
भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर याचा ‘बोलविता धनी कोण ?’ याची चर्चा आता सुरु झाली आहे. गडकरींचा वारू रोखण्यासाठी हे षडयंत्र असल्याचा संशय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.
Oct 18, 2012, 07:09 PM ISTचिल्लर आरोपांना महत्व देत नाही- गडकरी
अरविंद केजरीवाल यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवर केलेल्या गंभीर आरोपांना नितीन गडकरी यांनी ताबडतोब प्रत्युत्तर दिलं आहे. आपण अशा चिल्लर आरोपांना महत्व देत नाही असं सांगत नितीन गडकरी यांनी आपल्यावरील आरोप झटकायचा प्रयत्न केला आहे.
Oct 17, 2012, 07:51 PM ISTराज-उद्धव एकत्र आल्यास आनंद होईल- गडकरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र आले तर सर्वात जास्त आनंद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना होईल. मलाही या घटनेचा आनंद होईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
Oct 9, 2012, 08:26 PM ISTमाणिकराव आणि गडकरींमध्ये `तू तू- मै मै`
राज्यातल्या सिंचन प्रकल्पांना निधी देण्यासाठी केंद्राशी झालेल्या पत्रव्यवहाराचा वाद बराच रंगलाय. पत्र कोणी पाठवलं, यावरून वाद झडल्यानंतर आता ही पत्रं शेतक-यांच्या भल्यासाठी लिहिली की कंत्राटदारांच्या, यावरून तू-तू, मै-मै सुरू झालंय...
Oct 6, 2012, 08:48 PM ISTबाळासाहेबांची प्रकृती स्थिर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे. आज ते प्रसन्न मूडमध्ये होते. सकाळी त्यांनी पेपर वाचनही केलं.
Jul 26, 2012, 07:33 PM ISTविदर्भाचंही होऊ शकतं 'इस्त्राईल' – गडकरींचा दावा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पूर्ती उद्योग समूहाचे संस्थापक नितीन गडकरी यांनी नुकताच ५० शेतकऱ्यांना घेऊन इस्त्रायलचा कृषी दौरा केला. त्यांनी विदर्भातही इस्त्रायलासारखी शेती होऊ शकेल, असा ठाम विश्वास विशेष चर्चासत्रात व्यक्त केलाय. 'पूर्ती’ उद्योग समूहातर्फे शेतकऱ्यांना विशेष सवलतीत सोलर पंपही दिले जाणार असल्याचं यावेळी त्यांनी जाहीर केलंय.
Jul 19, 2012, 11:33 AM ISTगडकरींच्या वाढदिवसासाठी ५५ किलोचा केक
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचा ५५ वा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला.
May 27, 2012, 04:24 PM ISTसेनाप्रमुखांच्या भेटीबद्दल गडकरींचा खुलासा
भाजप अध्यक्ष नितीन गडकरी मातोश्रीवर दाखल झाले. आणि वेगवेगळे तर्क-वितर्क आणि चर्चांना उधाण आलं. पण, आपण आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी बाळासाहेबांची भेट घेतल्याचा खुलासा गडकरींनी केलाय.
May 27, 2012, 04:16 PM ISTभाजपनं काय कमावलं, काय गमावलं?
मिशन 2014 हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक मोठ्या गाजावाजात मुंबईत पार पडली खरी मात्र, या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्तानं भाजपातील दुफळीच प्रामुख्यानं समोर आली.
May 25, 2012, 07:34 PM ISTभाजपाची दोरी, दुसऱ्यांदा हाती घेणार गडकरी!
नितीन गडकरी पुन्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत हा प्रस्ताव मंजूर झालाय. आता हा प्रस्वात अंतिम मंजूरीसाठी राष्ट्रीय परिषदेकडे पाठवण्यात येणार आहे. यामुळं दुस-यांदा भाजप अध्यक्ष होण्याचा गडकरींचा मार्ग मोकळा झाला आहे.
May 24, 2012, 08:27 PM IST