गायिका

पाकिस्तानी गायिकेचा 'सेल्फी' वायरल आणि शिव्यांची लाखोली

प्रसिद्ध पाकिस्तानी गायिका कोमल रिजवी सध्या सोशल वेबसाईट फेसबुकवर लोकांच्या रागाचा आणि मस्करीचा विषय ठरलीय. निमित्त आहे ते तिनं आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केलेला 'सेल्फी'...

Jul 7, 2015, 10:10 AM IST

जयालक्ष्मी मोठी गायिका होईल - लता मंगेशकर

लिटिल लता मंगेशकर उशी उपमा मिळालेली 'सरस्वती' असे नाव दिलेली जयालक्ष्मी मोठी गायिका होईल. ती चांगली गात आहे, असे कौतुक करुन ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी तिला आशीर्वाद दिला.

Nov 25, 2014, 01:57 PM IST

`ऑस्ट्रियन ड्रॅग क्वीन`नं जिंकली `युरोव्हिजन साँग` स्पर्धा

ऑस्ट्रियाची `दी बिअर्डेड् लेडी` म्हणून प्रसिद्ध असलेली गायिका कॉन्चिटा व्रुस्ट हिनं शनिवारी १० मे पार पडलेली `युरोव्हिजन साँग` स्पर्धा जिंकली. जगभरातील ४५ देशांतून जवळजवळ १८० दशलक्ष प्रेक्षकांनी टिव्हीवरून या स्पर्धेचा आनंद लुटला.

May 13, 2014, 12:06 PM IST

`आलिया गायिकाही आहे हे माहितीच नव्हतं`

आपली मुलगी आलिया एक चांगली गायिकाही आहे, याचा पत्ताच सिनेनिर्माता महेश भट्ट यांना नव्हती... अशी कबुली खुद्द भट्ट यांनीच दिलीय.

Feb 24, 2014, 03:22 PM IST

…आणि मॅडोनाचा पाय घसरला!

नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेली अमेरिकेतील पॉपस्टार मॅडोनाचा पाय घसरलाय... होय, तीनं घातलेल्या उंच टाचांच्या सँन्डलमुळे तिच्यावर सर्वांदेखत तोंडावर पडण्याची वेळ आली.

Jan 18, 2014, 07:13 PM IST

आशा भोसले बोलल्या मुलीच्या आत्महत्येबद्दल...

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलीच्या आत्महत्येचं दु:ख एका मुलाखतीत व्यक्त केलंय.

Jan 13, 2014, 04:22 PM IST

‘लंबी जुदाई...’च्या गायिका रेश्मा यांचं निधन

जेष्ठ पाकिस्तानी पार्श्वगायिका रेश्मा यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ६६ वर्षांच्या होत्या. रेश्मा या घशाच्या कर्करोगामुळं त्रस्त होत्या. गेल्या महिनाभरापासून त्या कोमात होत्या. लाहोरमध्ये एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. रुग्णालयातच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Nov 3, 2013, 11:29 AM IST

आता प्रियंका येणार नव्या रुपात!

आपल्यातल्या वेगवेगळ्या टॅलेंटमुळं प्रियंका चोपडा नेहमीच चर्चेत असते. केवळ अॅक्टिंगच नाही तर आपण अनेकदा तिची मिमिक्री सुद्धा पाहिली आहे. पण आता प्रियंका गाणार आहे...

Oct 20, 2013, 12:31 PM IST

हॅपी बर्थ डे आशाताई!

सूर सम्राज्ञी आशा भोसले यांचा आज वाढदिवस आहे. आशा भोसले आज ८१ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. आशा यांच्या जन्म ८ सप्टेंबर १९३३ साली सांगलीत झाला. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९४३ साली केली.

Sep 8, 2013, 01:06 PM IST

संगीत रंगभूमीच्या ‘शिलेदार’ हरपल्या

मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी जयमालाबाई शिलेदार यांचं पहाटे पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. पहाटे 2 च्या दरम्यान पुण्यातल्या पं. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 86 वर्षांच्या होत्या. जयमालाबाईंच्या निधनानं संगीत रंगभूमीच्या ‘शिलेदार’च हरपल्या अशी प्रतिक्रिया संगीत क्षेत्रात व्यक्त होतेय.

Aug 8, 2013, 08:32 AM IST

प्रसिद्ध गायिका शमशाद बेगम यांचे निधन

प्रसिद्ध गायिका शमशाद बेगम यांचे आज मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Apr 24, 2013, 06:12 PM IST