`आलिया गायिकाही आहे हे माहितीच नव्हतं`

आपली मुलगी आलिया एक चांगली गायिकाही आहे, याचा पत्ताच सिनेनिर्माता महेश भट्ट यांना नव्हती... अशी कबुली खुद्द भट्ट यांनीच दिलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 24, 2014, 03:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपली मुलगी आलिया एक चांगली गायिकाही आहे, याचा पत्ताच सिनेनिर्माता महेश भट्ट यांना नव्हती... अशी कबुली खुद्द भट्ट यांनीच दिलीय.
`स्टुडंट ऑफ द इअर` फेम अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या `हायवे` या सिनेमात तिनं एक गाणंही गायलंय. हायवे हा आलियाचा दुसरा चित्रपट आहे.
६५ वर्षीय महेश भट्ट यांना याबद्दल विचारलं असता, ही माझ्यासाठी एक धक्कादायक गोष्ट होती. आलिया एव्हढं चांगलं गाऊ शकते, याचा मला थांगपत्ताही नव्हता. ती केव्हा एव्हढी बहुमुखी प्रतिभा ल्याली आणि कधी सरस्वतीनं तिच्यावर कृपा केली हे मलाही कळलं नाही. आलियानं २१ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या `हायवे` या सिनेमात `सूहा साहा` या गीतासाठी आपला आवाज दिलाय.
आलिया हिला इम्तियाज अली दिग्दर्शित या सिनेमात तिच्या उत्कृष्ठ अभिनयासाठी प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळालीय. आपल्या वडिलांबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायला आवडेल, असं आलियानं नुकतंच म्हटलं होतं. परंतु, महेश भट्ट यांचा मात्र इतक्यात असा कोणताही सिनेमा बनवण्याचा विचार नाही.
`आम्ही या पद्धतीनं कधी विचारच केलेला नाही. आम्ही सिनेमा बनवतं असतो... आणि आम्ही एकमेकांसोबत काम करणार नाही असंही काही नाहए... हा आलियाचा स्वत:चा मार्ग असेल... असं काही असेल तर आम्ही एकत्र काम करू... नाही तर ही काही जरुरी नाही` असं महेश भट्ट यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.